SAW vs ENGW test: सध्या क्रिकेट सामन्यांमध्ये डीआरएस डिसीजन रिव्ह्यू सिस्टीमला खूप महत्त्व आहे. सामन्याचा रोख बदलण्यासाठी एक विकेट खूप महत्त्वाची असते. त्यामुळे डीआरएसचा सामन्यात मोठा फायदा असतो. पण आता एका कसोटी सामन्यात डीआरएसचा वापरच होणार नाही आहे. डीआरएशिवाय हा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. यामागचं नेमकं कारण काय आहे जाणून घेऊया.

दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ २२ वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी सामना खेळणार असून त्यात डीआरएस नसणार आहे. आफ्रिका महिला संघ इंग्लंड महिला संघादरम्यान एकमेव कसोटी खेळणार आहे. उभय संघांमधील सामना ब्लोमफॉन्टेन येथे होणार आहे. EPSNcricinfo च्या वृत्तानुसार, कसोटी सामन्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका होती, ज्यामध्ये DRS चा वापर करण्यात आला होता. हे तंत्रज्ञान खूप महाग आहे आणि या कारणास्तव कसोटीमध्ये वापरले जाणार नाही.

BCCI Vice President Rajeev Shukla statement on Gautam Gambhir Rohit Sharma sports news
गंभीर, रोहितमध्ये मतभेद नाहीत!‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्लांचे वक्तव्य
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
BCCI New Rule Team India Players May Receive Performance based variable pay After Test Defeat
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पराभव पडणार भारी; थेट पगारावर परिणाम होणार? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Bumrah may lose out on Test captaincy
कसोटी कर्णधारासाठी दीर्घकालीन पर्यायाची गरज; बुमराच्या क्षमतेवरून निवड समितीमध्येच संभ्रम
Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन
MPSC announced that it will now conduct screening exams for 33 posts of various types
मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून तब्बल ३३ पदांच्या चाळणी परीक्षेसाठी…
Mohammed Kaif Statement India Defeat Said You will beat Pakistan in Champions Trophy and will act like we are the best
“पाकिस्तानवर विजय मिळवाल अन्…”, भारताच्या कसोटी मालिका पराभवावर माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला सुनावलं
Cricket Australia Breaks Silence on Not Inviting Sunil Gavaskar For Border Gavaskar Trophy Presentation
IND vs AUS: सुनील गावस्करांचा अपमान केल्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं वक्तव्य, आपली चूक केली मान्य; नेमकं काय घडलं?

हेही वाचा – IND vs AUS: सिराजची युक्ती अन् नितीश रेड्डीने मिळवून दिली विकेट, लबुशेनला बेल्सची परत अदलाबदली करणं पडलं महागात; VIDEO व्हायरल

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने केवळ एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांसाठी डीआरएस तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण टी-२० रँकिंग आणि महिला चॅम्पियनशिपच्या दृष्टीने टी-२० आणि एकदिवसीय सामने त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रीय संघ आणि उच्च कार्यप्रदर्शन संचालक, एनोक एनक्वे म्हणाले की, सध्याच्या महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटा जास्त महत्त्व असल्यामुळे, संसाधने मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी वापरली जात आहेत .

हेही वाचा – ३ दिवसांत पाकिस्तानच्या तीन खेळाडूंनी जाहीर केली निवृत्ती, भारताविरूद्ध पदार्पण करणाऱ्या ‘या’ गोलंदाजाने क्रिकेटला केलं अलविदा

दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वीच एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरला होता. पण त्यांचे लक्ष्य महिला चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी राहण्याचे होते. सध्या संघ एकदिवसीय क्रमवारीत चौथ्या आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहेत. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत डीआरएसमध्ये बिघाड झाला होता.

हेही वाचा – Mohammed Shami: शमीला ऑस्ट्रेलिया नाही हैदराबादचं मिळालं तिकीट, गाबा कसोटीदरम्यान आली मोठी अपडेट

पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लॉरेन बेलचा चेंडू ताजमीन ब्रिट्सच्या पॅडला लागला आणि तिला पायचीत असल्याने बाद घोषित करण्यात आले. तिला रिव्ह्यू घ्यायचा होता, पण तांत्रिक बिघाडामुळे ती रिव्ह्यू घेऊ शकली नाही.

Story img Loader