करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही अंशी लोक करोनातून पूर्णपणे बरे होत आहेत. करोनाचा फटका क्रीडाक्षेत्रालाही बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान क्रीडाक्षेत्रातून एक धक्कादायक बातमी आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एका क्रिकेटपटूला करोनाची लागण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“IPL वर अनेकांचे EMI अन् संसार अवलंबून आहेत, त्याचं काय?”

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू सोलो नक्वेनी याला करोनाची लागण झाली आहे. तो दक्षिण आफ्रिकेचा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहे. गेली काही महिने तो विविध आजारांशी दोन हात करत आहे. पण याच दरम्यान त्याला करोना झाल्यामुळे त्याने ट्विटरद्वारे एक पोस्ट लिहून माहिती दिली आहे. गेल्या वर्षी मला GBS चा आजार झाला. गेली १० महिने मी त्या आजारावर मात करण्यासाठी उपचार घेत आहे आणि हळूहळू बरा होत आहे. त्यात मला TB झाला, माझं लिव्हर आणि किडनी निकामी झाली. आता त्यात भर म्हणून मला करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मला कळत नाहीये की सगळे आजार मलाच का होत आहेत, असे भावनिक ट्विट त्याने केले आहे.

क्रिकेटपटू सोलो नक्वेनी याचं वय केवळ २५ वर्षे आहे. तो सध्या स्कॉटलंड मध्ये असून तिथूनच त्याने त्याच्याबाबतची ही माहिती दिल्याचे पिटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. सोलो नक्वेनी हा करोनाची लागण झालेला तिसरा क्रिकेटपटू आहे. या आधी पाकिस्तानचा जफर सर्फराज आणि स्कॉटलंडचा माजीद हक यांनाही करोनाची लागण झाली होती. गेल्या वर्षी आजारपणात उपचार घेताना तो चार आठवडे कोमात होता.

क्रिकेटपटू सोलो नक्वेनी (फोटो सौजन्य – ट्विटर / सोलो नक्वेनी)

And it’s a SIX … युवराजने शेअर केला खास VIDEO

सोलो नक्वेनी याने २०१२ साली आफ्रिकेच्या १९ वर्षाखालील संघात क्रिकेट खेळले. तसेच लीग स्पर्धांमध्येही त्याने विविध संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. हेराल्ड लाईव्हच्या माहितीनुसार सध्या सोलो नक्वेनी हा अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.