वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यानंतर एक फोटो व्हायरल झाला. दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजच्या बॅटवर ‘ओम’ लिहिलेलं आहे. ओम अक्षरामुळे चाहत्यांचा क्षणभर गोंधळ उडाला. दक्षिण आफ्रिकेच्या संघात ओम लिहिणारा खेळाडू आहे हे अनेकांना प्रथमच समजलं. दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्डकपसाठी भारतात दाखल झाला. त्यांचे सराव सामने तिरुवनंतपुरम इथे होते. केशवने लगेचच पद्मनाभन मंदिराला भेट दिली. पारंपिक वेष्टी परिधान केलेला फोटो त्याने शेअर केला होता. दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या सोशल मीडिया हँडल्सवरून एक गंमतीशीर व्हीडिओ शेअर करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना तिरुवनंतपुरम म्हणायाला सांगण्यात आले. एखाददुसऱ्या खेळाडूलाच तिरुवनंतपुरम नीट म्हणता आलं. त्यापैकी एक केशव महाराज होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत मार्नस लबूशेनला बाद केल्यानंतर केशवने आकाशकडे पाहत देवाचे आभार मानत नमस्कार केला होता.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
Nitish Reddy climbs Tirupati Temple stairs on knees After Stunning Test Debut & Century vs Australia
Nitish Reddy: नितीश रेड्डी गुडघ्यावर चढला तिरूपतीच्या पायऱ्या, ऑस्ट्रेलियातील शतकानंतर देवाचे असे मानले आभार; VIDEO व्हायरल
Just tell Virat Kohli you have a match against Pakistan Shoaib Akhtar advice to India Champions Trophy vbm
Champions Trophy 2025 : ‘त्याला सांगा पाकिस्तानविरुद्ध मॅच आहे…’, विराटला फॉर्ममध्ये आणण्यासाठी शोएब अख्तरने भारताला दिला खास मंत्र
South Africa announce Champions Trophy squad Temba Bavuma to Lead
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, एडन मारक्रम नाही तर ‘हा’ खेळाडू कर्णधार
Sabalenka Zverev progress
सबालेन्का, झ्वेरेवची विजयी सलामी
Passenger bitten security force jawan, Vasai,
वसई : प्रवाशाने घेतला सुरक्षा बलाच्या जवानाचा चावा

गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात होता. पहिला ट्वेन्टी२० सामना केरळमधल्या तिरुवनंतपुरम इथे झाला होता. केशवने त्याही वेळेस पद्मनाभन मंदिराला भेट दिली होती.

दर्शन झाल्यानंतर केशवने सोशल मीडियावर फोटो शेअर केला. ‘जय माता दी’ असं लिहून केशवने भारतीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

भारतासारख्या बलाढ्य संघाला खणखणीत पद्धतीने हरवणं खूप महत्त्वपूर्ण असल्याची पोस्ट केशवने लिहिली होती. भारताचा संघ तुल्यबळ आहे, त्यांना नमवणं हे दक्षिण आफ्रिका संघासाठी मोठं यश आहे अशी पोस्ट केशवने लिहिली. पोस्टनंतर केशवने ‘जय श्रीराम’ असं लिहिलं होतं.

दक्षिण आफ्रिका संघाच्या विजयाचं महत्त्व सांगणाऱ्या पोस्टनंतर ‘जय श्रीराम’ दिसल्याने भारतीय चाहते चक्रावून गेले. केशवचं भारतीय कनेक्शन समजून घेणं आवश्यक आहे.

केशव हनुमानाचा भक्त आहे. बनासवाडी इथल्या हजार वर्ष पुरातन हनुमान मंदिराला त्याने भेट दिली होती. त्यावेळी तिथे विलक्षण ऊर्जामय वातावरण अनुभवल्याचं केशवने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

आणखी वाचा: डेव्हॉन कॉनवे-चांगल्या संधीच्या शोधात त्याने घर विकलं, गाडी विकली, देशही सोडला

उत्तर प्रदेशातलं सुलतानपूर हे महाराज कुटुंबांचं मूळ गाव. 1874 मध्ये त्याचे पूर्वज भारतातून दक्षिण आफ्रिकेत रवाना झाले. कारण अर्थातच रोजगार हे होतं. दक्षिण आफ्रिकेतल्या दरबान इथे महाराज कुटुंबीय स्थायिक झाले. ते तिथेच राहिले, पुन्हा भारतात आले नाहीत.

केशवचे वडील आत्मानंद महाराज हेही क्रिकेटपटू होते. दक्षिण आफ्रिकेतल्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ते खेळायचे पण देशासाठी खेळू शकले नाहीत. केशवच्या क्रिकेट आवडीला त्यांनी प्रोत्साहन दिलं.

क्वा झुलू नाताल हा दक्षिण आफ्रिकेतल्या डोमेस्टिक क्रिकेटमधला अग्रणीचा संघ. केशवही त्याच संघाकडून खेळला. दक्षिण आफ्रिकेतल्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना पोषक असतात. त्यामुळे वेगवान गोलंदाज होणं साहजिक पण केशवने फिरकीवर लक्ष केंद्रित केलं. योगायोग म्हणजे केशवने ऑस्ट्रेलियातल्या चेंडूला सर्वाधिक उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीवर अर्थात पर्थ इथे कसोटी पदार्पण केलं. 49 कसोटी, ३४ वनडे आणि २६ ट्वेन्टी२० सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे.

धावांना वेसण घालतानाच विकेट्स पटकावणं ही केशवची खासियत आहे. केशव उपयुक्त फलंदाजीही करतो आणि उत्तम क्षेत्ररक्षक आहे.

आणखी वाचा: दोन देशांकडून खेळणारा, कोहलीचा सहकारी आणि ३८ वर्षांचा चिरतरुण शिलेदार

केशव क्रिकेटपटू होईल यासंदर्भात भारताचे माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांनी भाकीत वर्तवलं होतं. इंडियन एक्स्प्रेसचे संदीप द्विवेदी यांनी यासंदर्भात लिहिलं होतं. ते लिहितात, 1992 मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. वर्णभेदी धोरणामुळे दक्षिण आफ्रिका संघावरची बंदी उठल्यानंतरचा हा दौरा होता.

त्यावेळी भारताचे विकेटीकीपर बॅट्समन किरण मोरे यांच्याबरोबर एका चिमुरड्याचा फोटो आहे. किरण, आत्मानंद यांच्या घरी गेले होते. त्यावेळी हा फोटो काढण्यात आला होता. किरण यांनी हा मुलगा क्रिकेट खेळेल असं भाकीत वर्तवलं होतं.

भारतीय संघातील क्रिकेटपटूंना भेटणं तेव्हाही सोपं नव्हतं. आत्मानंद यांचे काका ज्या कंपनीसाठी काम करायचे ती कंपनी दौऱ्याचे मुख्य प्रायोजक होती. या कंपनीने भारतीय खेळाडूंसाठी मेजवानीचं आयोजन केलं होतं. काकांना अर्थातच निमंत्रण होतं. पण ऐनवेळी कामामुळे ते जाऊ शकले नाहीत. आत्मानंद यांची क्रिकेटची आवड काकांना ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी निमंत्रण पुतण्याला दिलं. आत्मानंद त्या कार्यक्रमात प्रवीण अमरे आणि किरण मोरे यांना भेटले.

मोरे आत्मानंद यांच्या घरी गेले. त्यांच्या लेकाबरोबर म्हणजे केशवबरोबर फोटोही काढला. तो फोटो आत्मानंद यांच्याकडे आजही आहे. किरण मोरे यांनी सांगितलेलं खरं ठरलं. केशव आता दक्षिण आफ्रिका संघाचा अविभाज्य भाग आहे.

गेल्या वर्षीच केशवने कसोटी प्रकारात हॅट्ट्रिक घेण्याची किमया केली. दक्षिण आफ्रिकेसाठी टेस्ट क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा केशव केवळ दुसराच खेळाडू आहे. केशवने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना कायरेन पॉवेल, जेसन होल्डर आणि जोशुआ डिसिल्व्हाला बाद करत विक्रम केला. याआधी 1960 मध्ये जेफ गिफ्रिन यांनी आफ्रिकेसाठी पहिल्यांदा हॅटट्रिक घेतली होती.

नियमित कर्णधार तेंबा बावूमाच्या अनुपस्थितीत केशवने दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची धुराही सांभाळली आहे. दक्षिण आफ्रिकेने एकदाही वर्ल्डकप पटकावलेला नाही. भारतीय भूमीवर त्यांना हे स्वप्न साकार करायचे असेल तर फिरकीपटू केशवसह दक्षिण आफ्रिकेच्या सगळ्या खेळाडूंना प्रयत्नांची शर्थ करावी लागेल.

Story img Loader