Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats : सध्या जसप्रीत बुमराह हा भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मानला जातो. नवीन किंवा जुना चेंडू असो, भारताच्या या स्टारला प्रत्येक परिस्थितीत विकेट कशी काढायची हे माहित आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो, तेव्हा कर्णधाराला सर्वात आधी बुमराहची आठवण येते. पण टी-२० फॉरमॅटमध्ये बुमराहला टक्कर देणारा गोलंदाज तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घेऊया.

जसप्रीत बुमराहला टक्कर देणारा गोलंदाज दुसरा-तिसरा कोणी नसून दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेझ शम्सी आहे. याचा खुलासा तबरेझ शम्सीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने झाला आहे. आता तबरेझ शम्सी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेझ शम्सीने रविवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

ज्यामध्ये त्याने लिहिले की, ‘मला मजेशीर आकडेवारी मिळाली आहे. जसप्रीत बुमराह आणि मी समान टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे दोघांनीही तितकेच चेंडू टाकले आहेत आणि तितक्याच विकेट्सही घेतल्या आहेत. हा किती आश्चर्यकारक योगायोग आहे.’ जसप्रीत बुमराहने ७० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने १५०९ चेंडू टाकले असून ८९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेझ शम्सीनेही ७० टी-२० सामन्यांमध्ये १५०९ चेंडू टाकले असून ८९ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – Virat Kohli : ‘ऑस्ट्रेलियन चाहत्यांनो, विराट कोहलीला शेवटचं बघा…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी कोचचं मोठं वक्तव्य, जाणून घ्या कारण

बुमराह आणि तबरेझची आकडेवारी –

जसप्रीत बुमराह सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. २२ नोव्हेंबरपासून होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात बुमराह भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याने ४० कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने १७३ विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ८९ सामन्यांमध्ये १४९ विकेट्स आहेत. तबरेझ शम्सीने २ कसोटीत ६ विकेट्स आणि ५१ एकदिवसीय सामन्यात ७२ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – Babar Azam : ‘अरे, थोडी तरी लाज वाटू दे…’, चाहत्यांनी ऑस्ट्रेलियात बाबर आझमची उडवली खिल्ली; म्हणाले, ‘टी-२० मध्ये तुला…’

जसप्रीत बुमराह पर्थ कसोटीत भारतीय संघाची धुरा सांभाळणार –

आता रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह पर्थ कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करेल. रोहितशिवाय शुभमन गिलही पर्थ कसोटीतून बाहेर होण्याची शक्यता आहे. सराव सामन्यात दुसऱ्या स्लिपमध्ये झेल घेताना शुभमन गिलच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. दुखापतीनंतर तो खूप दुखत होता आणि स्कॅनसाठी लगेच मैदान सोडले. दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये सुरू होत आहे. त्या सामन्यासाठी शुभमन वेळेत तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे.

Story img Loader