Champions Trophy 2025 South Africa sports minister calls for boycotting Afghanistan : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या अडचणी संपताना दिसत नाही. यापूर्वी इंग्लंडच्या राजकारण्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानशी सामना न खेळण्याची मागणी केली होती आणि आता दक्षिण आफ्रिकेचे क्रीडामंत्री गेटन मॅकेन्झी यांनी या स्पर्धेत अफगाणिस्तानवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबईमध्ये हायब्रीड मॉडेल अंतर्गत होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडा मंत्र्याची अफगाणिस्तानवर बहिष्कार टाकण्याची विनंती –

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानप्रमाणेच इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका एकाच गटात आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडामंत्र्याच्या आधी, १६० हून अधिक ब्रिटिश राजकारण्यांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) ला पुढील महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट सामन्यावर बहिष्कार टाकण्याची विनंती केली होती. २०२१ मध्ये तालिबान सत्तेत परतल्यानंतर महिलांचा खेळातील सहभाग प्रभावीपणे बेकायदेशीर ठरला आहे. हा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमांचेही उल्लंघन आहे, परंतु अफगाणिस्तानला आयसीसी स्पर्धांमध्ये भाग घेण्याची परवानगी आहे.

दक्षिण आफ्रिकेचे क्रीडामंत्री काय म्हणाले?

कराची येथे २१ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ब गटातील सामन्यात दक्षिण आफ्रिकेला अफगाणिस्तानशी खेळायचे आहे. तथापि, मॅकेन्झीने दक्षिण आफ्रिकन क्रिकेटला या संघाविरुद्ध खेळण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून महिलांच्या हक्कांबाबत एक मजबूत संदेश जाऊ शकेल. मॅकेन्झी म्हणाले की, ‘क्रिकेट दक्षिण आफ्रिका, इतर देशांच्या संघटना आणि आयसीसीने त्यांना खेळातील महिलांच्या हक्कांबाबत काय संदेश द्यायचा आहे, याचा विचार केला पाहिजे. क्रीडा मंत्री या नात्याने दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानविरुद्ध खेळावे की नाही याबाबत अंतिम निर्णय घेणे माझ्या हातात नाही. जर माझ्या हातात असते, तर नक्कीच निर्णय घेतला असता.’

हेही वाचा – R Ashwin : ‘हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही…’, रविचंद्रन अश्विनच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, VIDEO होतोय व्हायरल

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आपली भूमिका केली स्पष्ट –

दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडामंत्र्यांच्या या विधानानंतर क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) ने आपली भूमिका स्पष्ट केली. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने म्हटले आहे की, ‘सीएसए अफगाणिस्तानमधील महिलांच्या हक्कांची वागणूक आणि दडपशाहीला घृणास्पद मानते. तसेच महिला क्रिकेटला समान मान्यता आणि संसाधने मिळायला हवीत, असा ठाम विश्वास आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी ही आयसीसी स्पर्धा असल्याने, आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या सहभागाच्या आवश्यकता आणि नियमांनुसार अफगाणिस्तानच्या परिस्थितीचे जागतिक संस्थेने मार्गदर्शन केले पाहिजे.’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South africas sports minister calls for boycott of afghanistan match in champions trophy 2025 vbm