दक्षिण कोरिया येथील एका क्लबची बाल्कनी कोसळून शनिवारी दोन जलतरणपटूंचा मृत्यू झाला. त्याशिवाय १६ खेळाडू जखमी झाले असून यांपैकी आठ जलतरणपटू जागतिक अजिंक्यपद जलतरण स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

‘‘कोयोटे अगली क्लबमध्ये सर्व जलतरणपटू पार्टी करत असताना हा प्रसंग घडला. या क्लबमधील बाल्कनी जमिनीलगतच्या उंचीपासून फक्त १६ फूट उंचीवर बांधण्यात आली असून जखमी झालेल्या खेळाडूंमध्ये १० विदेशी जलतरणपटूंचा समावेश आहे; परंतु ज्या दोन जलतरणपटूंचा मृत्यू झाला आहे, ते जागतिक स्पर्धेत सहभागी नव्हते,’’ असे ग्वांग्जू पोलीस संस्थेचे गुप्तहेर साँग गि-जू यांनी सांगितले. मृत पावलेल्या दोघांचे वय अनुक्रमे ३८ व २७ असे असून त्यांची नावे मात्र अद्याप समजू शकलेली नाहीत.

Story img Loader