आशियाई क्रीडा स्पर्धा येत्या काही तासांवर येऊन ठेपली असली तरी वातावरणनिर्मिती करण्यामध्ये दक्षिण कोरिया अपयशी ठरल्याचे चित्र आहे. कोरियाच्या विमानतळावर आणि इन्चॉन शहरांमध्ये स्पर्धेचे फलक लावण्यात आले असले तरी ही स्पर्धा नेमकी कधी होणार याबाबतीत माहिती देण्यात आलेली नाही. या स्पध्रेबाबत शहरामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत नाही. कोरियामध्ये तिसऱ्यांदा आशियाई स्पर्धा होत असून त्यांच्याकडे स्पर्धेच्या आयोजनाचा चांगला अनुभव गाठीशी असताना त्यांना वातावरणनिर्मिती करण्यात आलेले अपयश अनाकलनीय असल्याचे मत व्यक्त होत आहे. यापूर्वी १९८६ साली सेऊल आणि २००२ साली बुसान येथे आशियाई स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कोरियात वातावरणनिर्मितीचा अभाव
आशियाई क्रीडा स्पर्धा येत्या काही तासांवर येऊन ठेपली असली तरी वातावरणनिर्मिती करण्यामध्ये दक्षिण कोरिया अपयशी ठरल्याचे चित्र आहे.
First published on: 19-09-2014 at 05:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South korea fall short to create atmosphere