South Zone wins Duleep Trophy 2023 title: दुलीप ट्रॉफी २०२३चा अंतिम सामना दक्षिण आणि पश्चिम विभाग संघात खेळला गेला. या सामन्यात हनुमा विहारीच्या नेतृत्वाखाली दक्षिण विभागाने ७५ धावांनी पश्चिम विभागाचा पराभव केला. त्याचबरोबर निर्णायक सामन्यात चमकदार ट्रॉफी पटकावली. संघाच्या विजयाचा हिरो ठरला तो विद्वत कवेरप्पा ठरला, ज्याने ८ विकेट्स घेतल्या. युवा गोलंदाजाने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली, ज्यामुळे त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही देण्यात आला.

दक्षिण विभागाने पहिल्या डावात २१३ तर दुसऱ्या डावात २३० धावा केल्या. यादरम्यान हनुमाने पहिल्या डावात १३० चेंडूंचा सामना करत ६३ धावा केल्या. त्याच्या खेळीत ९ चौकारांचा समावेश होता. मयंकने पहिल्या डावात २८ धावा केल्या. दुसऱ्या डावात हनुमाने ४२ धावा केल्या. मयंकने ३५ धावांचे योगदान दिले. तिलक वर्माही विशेष काही करू शकला नाही. वॉशिंग्टन सुंदरने दुसऱ्या डावात ३७ धावा केल्या. त्याने ७५ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार मारले.

पश्चिम विभागाचा संघ पहिल्या डावात १४६ धावांवर आटोपला. तर दुसऱ्या डावात २२२ धावा केल्या. अशाप्रकारे त्यांना अंतिम फेरीत ७५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पृथ्वी शॉने संघासाठी पहिल्या डावात ६५ धावांचे योगदान दिले. त्याने १०१ चेंडूंचा सामना करत ९ चौकार मारले. कर्णधार प्रियांक पांचाळने दुसऱ्या डावात ९५ धावांची शानदार खेळी केली. तरीही संघाला विजय मिळविता आला नाही. त्याने २११ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार मारले. दक्षिण विभागाच्या कवेरप्पाने शानदार गोलंदाजी केली. त्याने १९ षटकात ५३ धावा देत ७ बळी घेतले.

सूर्या-पुजारा ठरले अपयशी –

हेही वाचा – ‘बाबा तुम्ही खुश आहात ना’; पहाटे साडेचारला वडिलांना VIDEO CALL केल्यानंतर यशस्वी झाला होता भावूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम विभागीय संघाला भारतीय संघाचा अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि मिस्टर 360 सूर्यकुमार यादव यांच्याकडून खूप आशा होत्या. मात्र, या दोघांनी पण संघाची निराशा केली. पुजाराने पहिल्या डावात केवळ ९ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात संघाला मोठ्या धावांची गरज असताना त्याला केवळ १५ धावांचे योगदान देता आले. याशिवाय सूर्यकुमार यादवने पहिल्या डावात ८ तर दुसऱ्या डावात केवळ ४ धावा केल्या. अशा परिस्थितीत संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.