South Zone won the Deodhar Trophy 2023 by beating East Zone: देवधर करंडक २०२३ मधील अंतिम सामना गुरुवारी पार पडला. या सामन्यात दक्षिण विभागीय संघाने पूर्व विभागावर ४५ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर दक्षिण विभागीय संघाने मयंक अग्रवालच्या नेतृत्त्वाखाली देवधर करंडकावर नाव कोरले. या स्पर्धेपूर्वी दक्षिण विभागाने मयंकच्या नेतृत्वाखाली दुलीप ट्रॉफी २०२३ चे विजेतेपद पटकावले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मोसमात, दक्षिण विभाग संघाने फायनलसह एकूण सहा सामने खेळले आणि सर्व जिंकले, तर संघाचा कर्णधार मयंक अग्रवाल देखील त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. या सामन्यात शतक झळकावणारा दक्षिण विभागाचा फलंदाज रोहन कुनुमलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या सामन्यात प्रथम फलंगदाजी करतानादक्षिण विभागाने ३२९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्यत्तरात पूर्व विभागाचा संघ २८३ धावांवर आटोपला.

जगदीशननेही झळकावले अर्धशतक –

दक्षिण विभागाकडून कर्णधार मयंक अग्रवालशिवाय यष्टीरक्षक फलंदाज एन जगदीशननेही अर्धशतक झळकावले. त्याने ५४ धावांची खेळी खेळली. रोहित रायडूने २६, साई किशोरने नाबाद २४, साई सुदर्शनने १९ आणि विजयकुमारने ११ धावा केल्या. पूर्व विभागाच्या संघाकडून शाहबाज अहमद, रियान पराग आणि उत्कर्ष सिंग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. दक्षिण विभागाने ५० षटकांत ८ गडी गमावून ३२८ धावा केल्या.

हेही वाचा – IND vs WI 1st T20: राष्ट्रगीत सुरू असताना हार्दिक पांड्या झाला भावूक, डोळ्यातील अश्रू पुसतानाचा फोटो व्हायरल

पूर्व विभागाला विजयासाठी ३२९ धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु हा संघ ४६.१ षटकात २८३ धावांत सर्वबाद झाला. पूर्व विभागाकडून रियान परागने झटपट (९५) धावा केल्या पण अवघ्या पाच धावांनी त्याचे शतक हुकले. त्याचबरोबर कुमार कुशाग्रने ५८ चेंडूत ३ षटकार व ६ चौकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या. कर्णधार सौरव तिवारीने २८ धावांचे योगदान दिले, मात्र त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. दक्षिण विभागातील सर्वात यशस्वी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर होता, ज्याने ३ विकेट्स घेतल्या. या स्पर्धेत पूर्व विभागाचा फलंदाज रियान पराग याला सामनावीराचा किताब देण्यात आला, ज्याने ५ सामन्यात सर्वाधिक ३५४ धावा केल्या. यामध्ये त्याच्या दोन शतकाचा समावेश होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South zone won the deodhar trophy 2023 by beating east zone by 45 runs vbm