Sixes banned at Southwick and Shoreham Cricket Club : क्रिकेटच्या खेळात चौकार आणि षटकार यांना विशेष महत्व आहे. त्यातल्या त्यात षटकार तर खेळाडू आणि चाहत्यांना खूपच प्रिय असतो. कारण खेळाडू झटपट धावा करण्यासाठी षटकार मारण्याला जास्त प्राधान्य देतात. ज्यामुळे त्यांचे चाहतेही खूश होऊन खेळाडूंना दाद देतात आणि संघालाही फायदा होतो. मात्र, इंग्लंडमधील एका जुन्या क्रिकेट क्लबने चक्क षटकार मारण्यावर बंदी घातली आहे. या क्लबमध्ये फलंदाजाने षटकार मारला, तर त्याला बाद घोषित केले जात आहे. त्यामुळे आज आपण त्या क्रिकेट क्लबचे नाव आणि त्यांनी षटकार मारण्यावर बंदी का घातलीय? जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लंडमधील साउथविक आणि शोरहॅम क्रिकेट क्लबची षटकारांवर बंदी घालण्याची कल्पना अगदी विचित्र वाटू शकते. पण या मागचे कारण त्याहूनही रंजक आहे. त्याचे कारण जाणून घेतल्यावर प्रत्येकजण म्हणू शकतो की हा निर्णय क्लबसाठी सोपा नसेल. क्लबने हा निर्णय घेतला कारण मैदानाजवळ राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची तक्रार दाखल केली होती. एवढेच नाही तर सामना पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना दुखापत आणि वाहनांच्या नुकसानाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या समस्येतून सुटका करण्यासाठी क्लबने हा नियम केला आहे.

पहिल्या षटकारानंतर ताकीद दिली जाणार –

या नियमात अशी तरतूद आहे की जर फलंदाजाने षटकार मारला तर त्याला बाद घोषित केले जाईल. मात्र, यात एकच शिथिलता आहे की, पहिला षटकार मारल्यास फलंदाजाला ताकीद दिली जाईल. मात्र ताकीद दिल्यानंतरही षटकार मारल्यास त्याला बाद घोषित केले जाईल. यापैकी पहिल्या षटकारानंतर ताकीद देण्याबरोबरच त्या संघाला षटकाराच्या ६ धावाही दिल्या जाणार नाहीत. साउथविक आणि शोरहॅम क्रिकेट क्लबचे कोषाध्यक्ष मार्क ब्रॉक्सअप यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, विम्याचे दावे आणि कायदेशीर कारवाईमुळे होणारा खर्च टाळण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे.

हेही वाचा – Paris Olympics 2024 : भारतासाठी नव्हे तर अमेरिका-कॅनडाकडून खेळणार ‘हे’ पाच भारतीय वंशाचे खेळाडू, जाणून घ्या कोण आहेत?

कोषाध्यक्ष काय म्हणाले?

या नियमाबाबत क्लबचे कोषाध्यक्ष मार्क ब्रॉक्सअप म्हणाले, ‘जुन्या काळी क्रिकेट शांत वातावरणात खेळले जायचे. पण टी-२० आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटच्या आगमनानंतर या खेळात अधिक आक्रमकता दिसू लागली आहे. खरं तर, स्टेडियमजवळ राहणाऱ्या एका ८० वर्षीय व्यक्तीने सांगितले की, आजचे खेळाडू इतके उत्साही झाले आहेत की त्यांच्यासाठी षटकार मारण्यासाठी स्टेडियमही छोटे होत आहे. मात्र, हा नियम केल्यानंतर अनेक खेळाडू विरोधही करत आहेत.’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Southwick and shoreham cricket clubs in england have banned sixes and any batsman who hits a six will be out vbm
Show comments