Euro Cup 2024 Final: युरो कप २०२४ चा अंतिम सामना आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दोन सर्वोत्तम संघ स्पेन आणि इंग्लंड यांच्यात खेळवला गेला. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली ज्यामध्ये अखेरीस स्पॅनिश संघाने अंतिम सामना २-१ने जिंकला आणि विजेतेपदावरही आपले नाव कोरले. यासह स्पेन ४ वेळा युरो कप जिंकणारा पहिला देश बनला आहे. मात्र, चौथी ट्रॉफी जिंकण्यासाठी त्यांना तब्बल १२ वर्षे प्रतीक्षा करावी लागली.

हेही वाचा – Wimbledon 2024: कार्लाेस अल्काराझ ठरला विम्बल्डन २०२४ चा चॅम्पियन! सरळ सेट्समध्ये नोव्हाक जोकोविचचा उडवला धुव्वा

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
nathan mcswinney
Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर

युरो कप २०२४ चा अंतिम सामना १५ जुलै रोजी बर्लिन, जर्मनी येथे स्पेन आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. तब्बल १२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्पेनने युरो चॅम्पियनशिप जिंकली. स्पेनने चौथ्यांदा युरो कपचे विजेतेपद पटकावले आहे. इतर कोणत्याही संघाने आतापर्यंत इतक्या वेळा युरो कप जिंकलेला नाही. २०२० च्या युरो कपच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर आता इंग्लंडला २०२४ च्या युरो कपच्या फायनलमध्येही पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडला आतापर्यंत युरो चॅम्पियनशिप जिंकण्यात यश मिळालेले नाही.

हेही वाचा – IND vs ZIM: अभिषेक शर्माचा पदार्पणाच्या मालिकेत अनोखा विक्रम, टी-२० मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा पहिला खेळाडू

Euro Cup Final Spain vs England: बरोबरीत होता सामना

स्पेन आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्यात इतकी जबरदस्त चढाओढ सुरू होती की पहिला गोल ४७व्या मिनिटाला झाला. ज्यामध्ये स्पॅनिश खेळाडू निकोने पहिला गोल केला. या गोलसह स्पेनने सामन्यात निश्चितपणे १-० अशी आघाडी घेतली होती, परंतु यानंतर इंग्लंडने झटपट पुनरागमन केले आणि सामन्याच्या ७३व्या मिनिटाला पाल्मरने गोलरक्षकाला चुकवत जबरदस्त गोल केला, त्यामुळे सामना १-१ असा बरोबरीत आला.

हेही वाचा – IND vs ZIM: एका चेंडूत १३ धावा! यशस्वी जैस्वालचा दुर्मिळ विक्रम, T20I च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

Euro Cup 2024: ८६व्या मिनिटाला गोल अन् स्पेन विजयी

सामना १-१ असा बरोबरीत आणत इंग्लंडने अतिशय आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तरात स्पेनचा संघही तसाच खेळताना दिसला आणि खेळाच्या ८६व्या मिनिटाला स्पेनचा अनुभवी खेळाडू ओयारझाबालने गोल करून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ९० मिनिटांचा खेळ संपल्यानंतर अतिरिक्त वेळेसाठी दिलेल्या ४ मिनिटांतही इंग्लंडचा संघ एकही गोल करण्यात यशस्वी होऊ शकला नाही आणि स्पेनने १२ वर्षांनंतर युरो कप जिंकला.