Spain footballer Lamine Yamal father hospitalised : १७ वर्षीय स्पॅनिश फुटबॉलपटू लॅमीन यमालच्या वडिलांना बार्सिलोनाजवळील पार्किंगमध्ये चाकूने भोसकल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना गंभीर दुखापत झाली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. या चाकू हल्लेच्या घटनेनंतर पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. ही घटना मातारोच्या रोकाफोंडा शेजारच्या फ्रँक मार्शल स्ट्रीटवरील कार पार्कमध्ये बुधवारी रात्री ९ ते १० च्या दरम्यान घडली.

स्थानिक वृत्तपत्रला व्हॅनगार्डियाच्या म्हणण्यानुसार, मातारोच्या रोकाफोंडा शेजारच्या फ्रँक मार्शल स्ट्रीटवरील कार पार्कमध्ये बुधवारी रात्री ९ ते १० च्या दरम्यान हल्लेखोरांनी मौनीर नसरौईवर अनेक वेळा चाकूने वार करुन पळ काढला. यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत कॅन रुती हॉस्पिटलच्या आपत्कालीन कक्षात नेण्यात आले. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

pune video Innocent Child Girl take Out Barbie Pink Phone to Click Photos
पुण्यातल्या चिमुकलीचा केवढा हा निरागसपणा! इतरांना मोबाईलमध्ये फोटो काढताना पाहून स्वत:ही काढला खेळण्यातला बार्बी फोन, VIDEO एकदा पाहाच
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
iPhone 15 and 14 Price cut
Apple iPhone Price in India: iPhone १६ लाँच होताच iPhone 15 आणि iPhone 14 च्या किंमती घसरल्या, जाणून घ्या नवे दर
Karan Aujla live show video
भर कॉन्सर्टमध्ये चाहत्याने फेकून मारला बूट, ‘तौबा तौबा’ फेम गायकानं केलं ओपन चॅलेंज, पाहा Video
Cockroach in Coffee
Cockroach in Coffee : मालाडच्या इनॉर्बिट मॉलमधल्या कॅफेत कोल्ड कॉफीत आढळलं झुरळ, ग्राहकाची थेट पोलिसात धाव
Accident News
Video Viral News : चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक तब्बल २० फूट खाली टँकरवर पडला; अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल
Gyanradha Multistate, cheated, arrest,
तब्बल ३,५१५ कोटींनी फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या प्रमुखांना अखेर ठोकल्या बेड्या
Loksatta Chatura Henrietta Lakes made a significant contribution to the Research of cancer
कॅन्सरच्या संशाेधनात मोलाचं योगदान देणारी हेनरिएटा लेक्स

मातरो पोलिसांकडून तपास सुरु –

या हल्ल्याचा आता मातरो पोलीस तपास करत आहेत. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी पूर्वीच्या वादातून हा वार झाला असावा, असा अंदाज आहे. स्पेनने जुलैमध्ये युरोपियन चॅम्पियनशिप जिंकली, यमाल विजयी संघाचा भाग होता आणि निको विल्यम्सने इंग्लंडवर २-१ च्या विजयात सुरुवातीच्या गोलमध्ये भूमिका बजावली. वयाच्या १७ व्या वर्षी त्याने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूचा पुरस्कारही जिंकला.

हेही वाचा – Mady Villiers Catch : जॉन्टी ऱ्होड्सच्या शैलीत ‘या’ महिला क्रिकेटपटूने हवेत झेपावत एका हाताने घेतला आश्चर्यकारक झेल

लॅमिन यमाल मोरोक्कन वडिलांचा मुलगा –

लॅमीन यमाल यांचे कर्तृत्व किती मोठे आहे हे समजून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबाकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. यामलचा जन्म २००७ मध्ये बार्सिलोनामध्ये एका सामान्य कुटुंबात झाला होता. त्याचे वडील मौनीर नसरौई मोरोक्कन आहेत आणि आई शीला इक्वेटोरियल गिनी मूळची आहे. तो मातारो, कॅटालोनिया येथे मोठा झाला. त्याच्या कुटुंबाबद्दल असे म्हणता येईल की ते सर्व एकमेकांना आधार देतात.