बलाढय़ स्पेनला युरो चषक फुटबॉल स्पध्रेच्या पात्रता फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेच्या पात्रता फेरीतील स्पेनचा आठ वर्षांंतील हा पहिलाच पराभव आहे. स्लोव्हाकियाने स्पेनवर २-१ अशी मात करत खळबळजनक विजयाची नोंद केली. अन्य लढतीत इंग्लंडने सॅन मारिनोचा ५-० असा धुव्वा उडवला.
स्पेनने पात्रता फेरीच्या सलामीच्या लढतीत मेसेडोनियावर ५-१ असा दणदणीत विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली होती, मात्र स्लोव्हाकियाच्या चिवट खेळासमोर स्पेनने शरणागती पत्करली. स्लोव्हाकियाने सहापैकी सहा गुण पटकावत ‘क’ गटात अव्वल स्थान मिळवले.
चेल्सीचे प्रतिनिधित्व केलेल्या मिरोस्लाव्ह स्टॉचने ८७व्या मिनिटाला निर्णायक गोल करत स्लोव्हाकियाला थरारक विजय मिळवून दिला. २००६मध्ये झालेल्या पराभवानंतर युरो पात्रता फेरीत स्पेनची ३६ सामन्यांमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम या पराभवाने मोडला. स्लोव्हाकियातर्फे जुराज कुकाने फ्री-किकच्या बळावर गोल केला. या गोलनंतर स्लोव्हाकियाने बचावावर भर देत स्पेनच्या आक्रमणाला थोपवले. दुसऱ्या सत्रात ८२व्या मिनिटाला पाको अलकेसरने गोल करत स्पेनला बरोबरी करून दिली. हा सामना बरोबरीत सुटणार असे चित्र होते, मात्र स्टॉचच्या गोलने चित्र पालटले.
फिल जगलइका, डॅनी वेलबेक, आंद्रोस टाऊनसेंड आणि वेन रुनी यांच्या प्रत्येकी चार गोलांच्या जोरावर इंग्लंडने सॅन मारिनोवर ५-० असा दणदणीत विजय मिळवला. स्वित्र्झलडवर २-० विजय मिळवलेल्या इंग्लंडने या सामन्यातही विजयी परंपरा कायम राखली. आता त्यांचा मुकाबला इस्टोनियाशी होणार आहे.
स्पेनला पराभवाचा धक्का
बलाढय़ स्पेनला युरो चषक फुटबॉल स्पध्रेच्या पात्रता फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेच्या पात्रता फेरीतील स्पेनचा आठ वर्षांंतील हा पहिलाच पराभव आहे.
First published on: 11-10-2014 at 01:19 IST
TOPICSस्पेन
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spain suffer first qualifying defeat in eight years