फिफा विश्वचषकाच्या तिसऱया सामन्यात नेदरलँड संघाने गतविजेत्या स्पेन संघाचा ५-१ असा खुर्दा उडवला.
गेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यांत एकमेकांसमोर उभे ठाकलेले युरोप खंडातील या दोन बलाढ्य संघांची यावेळी पहिल्याच फेरीत टक्कर झाली. यावेळी नेदरलँड संघ मागील पराभवाचा वचपा काढण्याच्या इर्शेने खेळताना दिसला आणि त्यांना यशही मिळाले.
सामन्याच्या २८ व्या मिनिटाला स्पेनला पेनल्टी किकच्या माध्यमातून आपले खाते उघडण्याची संधी मिळाली आणि अलोन्सोने स्पेनचे खाते उडघले. त्यानंतर नेदरलँड संघाने आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली आणि स्पेन संघाला एकामागोमाग एक धक्के दिले.
नेदरलँडसाठी प्रथम रॉबिन व्हॅन पर्सीने गोल करत बरोबरी साधली त्यानंतर ५३ व्या मिनिटाला आर्येन रॉबीनने गोल करत नेदरलँडला आघाडी मिळवून दिली. स्टेफनने शानदार गोल करत नेदरलँडला ३-१ ने आघाडी मिळवून दिली. दरम्यान, स्पेनचा संघ गोलसाठी झगडताना दिसला. तोपर्यंत रॉबीन व्हॅन पर्सीने पुन्हा एक गोल करत सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आणि सामन्याच्या 80 व्या मिनिटाला आर्येन रॉबीनने नेदरलँडसाठी पाचवा गोल करत स्पेनवर दणदणीत विजय नोंदविला.
आपल्या कसबदार शैलीने सामन्यात दोन गोल करणाऱया रॉबिन व्हॅन पर्सीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Story img Loader