Jenny Hermoso Kissing Luis Rubiales Controversy: जागतिक फुटबॉल संघटना फिफाने स्पॅनिश फेडरेशनचे अध्यक्ष लुईस रुबियल्स यांना ९० दिवसांसाठी निलंबित केले आहे. फिफा महिला विश्वचषक फायनल दरम्यान स्पॅनिश खेळाडू जेनी हर्मोसोसोबत झालेल्या कथित चुंबनाच्या घटनेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. फिफाची शिस्तपालन समिती या प्रकरणाची चौकशी करेल आणि तोपर्यंत रुबियल्स फेडरेशनच्या कोणत्याही उपक्रमात भाग घेऊ शकणार नाहीत.
फिफा फायनलमध्ये पुरस्कार सोहळ्यादरम्यान रुबियल्स हर्मोसोचे चुंबन घेताना दिसला होता. या घटनेनंतर जगभरात खळबळ उडाली. स्पेनच्या पंतप्रधानांनीही या घटनेची दखल घेतली आणि रुबियालेसची माफी पुरेशी नाही असा आग्रह धरला. हर्मोसोने आधीच सांगितले होते की, तिने स्पॅनिश एफएच्या अध्यक्षांला बन घेण्यास संमती दिली नव्हती. परंतु रुबियल्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. कारण त्याचे म्हणने आहे की, आपण कोणतीही सीमा ओलांडली नाही.
रुबियल्स काय म्हणाले?
स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचे लुईस रुबियल्स यांनी सांगितले. याआधी मीडियामध्ये बातम्या आल्या होत्या की, लुईस शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. रुबियाल्सने सोमवारी या घटनेबद्दल माफी मागितली, परंतु राजीनामा देण्यास नकार दिला.
हेही वाचा – Asia Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट संघाचा मोठा निर्णय! आशिया कपसाठीच्या मुख्य संघात केला ‘हा’ बदल
विश्वचषक विजेत्या स्पॅनिश राष्ट्रीय संघाने तसेच इतर अनेक खेळाडूंनी सांगितले आहे की, लुईस रुबियल्स महासंघाचे प्रमुख असताना, ते आंतरराष्ट्रीय सामने खेळणार नाहीत. दुसरीकडे, आरएफईफ आणि यूईएफए लुईस यांना शनिवारी फिफाच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाचे पालन करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत अन्य कोणतीही माहिती उपलब्ध करून दिली जाणार नसल्याचे समितीचे म्हणणे आहे.
हेही वाचा – रनआऊट झाल्यानंतर बॅट्समनला राग आला, अन् केलं असं काही की VIDEO होतोय व्हायरल
रुबियल्स म्हणाले, “मी माझ्या आदर्शाचे रक्षण करण्यासाठी बदनाम होण्यास तयार आहे. मला होत असलेल्या या छळाला मी पात्र नाही. त्यावेळी जे काही घडले त्याबद्दल मला न डगमगता माफी मागायची आहे. जेनीनेच मला पहिले उचलले. मी तिला पेनल्टीबद्दल विसरून सांगितले आणि मी तिला चुंबन विचारले आणि ती म्हणाली ठीक आहे. चुंबन सहमतीने केले होते. अनेक लोक मला पाठिंबा देत आहेत, तर अनेकजण विरोधातही आहेत.”