Yashasvi Jaiswal said if anyone talks about my mother or sister I will not tolerate it: भारतीय संघ काही दिवसांत वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जाणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या कसोटी आणि वनडे संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही संघांत युवा खेळाडू यशस्वी जैस्वालला संधी मिळाली आहे. त्याला आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केल्याच्या मोबदला मिळाला आहे. यशस्वी जैस्वालची संघर्षमय कारकीर्द सर्वश्रुत आहे, पण एक काळ असा होता की, ज्येष्ठ खेळाडू अजिंक्य रहाणेने यशस्वीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता, ज्याबद्दल यशस्वी जैस्वालने खुलासा केला आहे.

अलीकडेच, ललनटॉपच्या मुलाखतीदरम्यान, यशस्वी जैस्वाल आयुष्य आणि करिअरबद्दल बोलला. ज्यामध्ये अजिंक्य रहाणेने यशस्वीला रागाच्या भरात मैदानाबाहेर पाठवल्याची घटनाही नमूद करण्यात आली. आता त्या घटनेचा खुलासा यशस्वी जैस्वालने केला आहे. गेल्या वर्षी ही घटना घडल्यानंतर अजिंक्य रहाणेनेही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली होती. जैस्वालला सामन्याच्या मध्येच बाहेर का पाठवले यावर त्यांनी आपली भूमिका मांडली होती.

Paralympic gold medal Praveen Kumar Paralympics sport news
हार न मानण्याची प्रवृत्ती हीच प्रवीणची ताकद
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल
Suryakumar Yadav Injury Updates in marathi
Suryakumar Yadav : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्या दुखापतीतून सावरला नाही, तर कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्त्व?
Lakshya Sen Statement on Deepika Padukone She Called me After Bronze Medal Match
Lakshya Sen-Deepika Padukone: दीपिका पदुकोणने का केला लक्ष्य सेनला फोन? त्यानेच स्पष्ट केलं कारण
Kamran Akmal big statement on Virat Kohli and Rohit Sharma
Kamran Akmal : कोहली-रोहितबद्दल कामरान अकमलचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “पाकिस्तानमध्ये विराटपेक्षा जास्त तर…”
Wasim Jaffer on Shikhar Dhawan Retirement
Shikhar Dhawan : ‘जितक्या कौतुकासाठी पात्र होता तेवढे कौतुक कधीच…’, धवनबद्दल माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य; म्हणाला, तो संघहिताला…
former pakistan cricketer basit ali advises jasprit bumrah to focus on bowling instead of captaincy
कर्णधारपदामागे धावू नकोस! पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीचा बुमराला सल्ला

यशस्वी जैस्वालने सांगितले की, दुलीप ट्रॉफीच्या एका सामन्यादरम्यान त्याच्या विरोधी संघाचा खेळाडू रवी तेजासोबत खूप वाद झाला होता. त्यानंतर पश्चिम विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने त्याला वाद घालण्यास मनाई केली, पण त्यानंतरही तो थांबला नाही तेव्हा रहाणेने त्याला मैदानाबाहेर पाठवले.

हेही वाचा – Team India Sponsor: बीसीसीआयची मोठी घोषणा! टीम इंडियासाठी आता ‘ही’ कंपनी असणार मुख्य प्रायोजक

ललनटॉपशी बोलताना यशस्वी जैस्वाल म्हणाला की, “आता ज्या गोष्टी होऊन गेल्या आहेत त्याबद्दल बोलून काय उपयोग. खरं तर मी मानसिकदृष्ट्या खूप आक्रमक आहे. मला वाटतं कधी कधी ही गोष्ट बाहेर येते. पण मी त्यावेळी काही मोठं बोललो नाही पण हो ठीक आहे गोष्टी घडत राहतात आणि नंतर त्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही.”

यशस्वी जैस्वाल पुढे म्हणाल की, “मला काहीही बोलायचे नाही. मला ते माझ्याजवळच ठेवायला आवडेल. जेव्हा मला ते बोलावे वाटेल, तेव्हा मी त्यावर बोलेन. क्रिकेटचा कोणताही फॉरमॅट खेळला जात असला तरी वाद हे सर्रास होतात. हे आयपीएलसारख्या इव्हेंटमध्ये जितके स्पष्ट होत नाही, तितके मोठ्या फॉरमॅटच्या क्रिकेटमध्ये होते. त्यामुळे कोण काय म्हणतंय यावर अवलंबून असते. जर कोणी माझ्या आईबद्दल किंवा बहिणीबद्दल काही बोलले, तर मी ते अजिबात सहन करणार नाही.”