Prithvi Shaw says I have to play for India for 12 to 14 years : आयपीएल २०२३ मध्ये फ्लॉप ठरलेला पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमध्ये धावांचा पाऊस पाडत आहे. २३ वर्षीय भारतीय फलंदाजाने इंग्लिश भूमीवर एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. पृथ्वी शॉ बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. रॉयल एकदिवसीय चषकात धडाकेबाज शतक झळकावल्यानंतर त्याने आता एकदिवसीय विश्वचषकासाठी दावा केला आहे. पृथ्वी शॉने २४४ धावांची इनिंग खेळून टीम इंडियाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शॉची टीम इंडियासाठी १४ वर्षे खेळण्याची इच्छा –

२४४ धावांची खेळी खेळल्यानंतर पृथ्वी शॉने क्रिकबझशी संवाद साधत हृदयस्पर्शी विधान केले. आपले स्वप्नाबद्दल खुलासा करताना पृथ्वी शॉ म्हणाला, “माझे एक स्वप्न आहे, मला किमान १२-१४ वर्षे भारतासाठी खेळायचे आहे. मला भारतासाठी विश्वचषक जिंकायचा आहे. हे एक मोठे ध्येय आहे. मला माझ्या आयुष्यात हे साध्य करायचे आहे. त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील आणि धावा कराव्या लागतील, मी प्रयत्न करत आहे. ही सगळी मेहनत माझ्या या स्वप्नासाठी आहे.”

पृथ्वी शॉने ठोकले झंझावाती द्विशतक –

इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या रॉयल वनडे चषकात पृथ्वी शॉने द्विशतक झळकावले आहे. त्याने सॉमरसेटविरुद्ध २४४ धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. या खेळीत पृथ्वी शॉच्या बॅटमधून १५३ चेंडूत २८ चौकार आणि ११ षटकार निघाले. त्याने १५९ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. पृथ्वी शॉच्या या खेळीच्या जोरावर नॉर्थहॅम्प्टनशायरने ८ गडी गमावून ४१५ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात सॉमरसेटचा संघ ३२८ धावा करत सर्वबाद झाला. त्यामुळे पृथ्वी शॉच्या संघाने हा सामना ८७ धावांनी जिंकला.

हेही वाचा – Asia Cup 2023: टीम इंडियाच्या जर्सीवर पहिल्यांदाच दिसणार पाकिस्तानचे नाव, जाणून घ्या यामागचं कारण

टीम इंडियातून पृथ्वी शॉ बराच काळ बाहेर –

पृथ्वी शॉ २०२० मध्ये टीम इंडियासाठी शेवटची कसोटी खेळला होता. २०२१ नंतर त्याला ना एकदिवसीय संघात स्थान मिळाले आणि ना टी-२० मध्ये खेळण्याची संधी मिळाली. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याची निवड झाली असली तरी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. यानंतर हा युवा फलंदाज आयपीएल २०२३ मध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला. आता तो टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या रॉयल लंडन वनडे कपमध्ये मेहनत घेत आहे.