दीपक जोशी

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकाच्या १२व्या पर्वात उपांत्य फेरीपर्यंत सर्वाधिक ११ वेळा ३०० धावांचा टप्पा ओलांडण्यात आला. कोणत्याही विश्वचषकात प्रथमच इतक्या वेळा ३०० धावा करण्यात आला. यापूर्वी २०१५च्या विश्वचषकात १० वेळा, तर २००७मध्ये नऊ वेळा ३०० धावांचा टप्पा ओलांडण्यात संघ यशस्वी ठरले होते. त्याचप्रमाणे विश्वचषकात एकाच दिवशी पाच फलंदाजांनी शतके झळकावण्याचा विक्रम भारत-श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यांत नोंदवला गेला. यापूर्वी २००७मध्ये दोन वेळा एकाच दिवशी चार फलंदाजांनी शतके झळकावली होती.

Story img Loader