Special Ceremony IND vs PAK: एकदिवसीय विश्वचषक २०२३ सुरू झाला आहे. सर्व संघांनी किमान एक सामना खेळला आहे, परंतु या विश्वचषकात सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे उद्घाटन सोहळा नव्हता. आता बातम्या येत आहेत की भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान बीसीसीआय उद्घाटन समारंभाची उणीव भरून काढणार आहे. हा अधिकृत उद्घाटन सोहळा नसून या सामन्यादरम्यान क्रिकेट जगतातील आणि बॉलिवूडमधील अनेक स्टार्स अहमदाबाद स्टेडियमवर पोहोचतील.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचणार आहेत. त्याचवेळी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही स्टेडियममध्ये राहून हा सामना पाहणार आहे. या सामन्यादरम्यान लोकप्रिय गायक अरिजित सिंगही परफॉर्म करणार आहे. सामन्यादरम्यान आतषबाजी किंवा लेझर शो देखील होईल. मात्र, यासंदर्भात बीसीसीआय किंवा आयसीसीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
विश्वचषक सुरू होण्याआधी, टूर्नामेंटचा उद्घाटन सोहळा होणार असल्याच्या बातम्या होत्या, ज्यामध्ये रणवीर सिंग, तमन्ना भाटिया, आशा भोसले, अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल परफॉर्म करणार आहेत. मात्र, असे काहीही झाले नाही आणि विश्वचषकाचा उद्घाटन सोहळाही झाला नाही. नंतर बातमी आली की उद्घाटन समारंभ झाला नसला तरी या स्पर्धेचा समारोप समारंभ आयोजित केला जाईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला उपांत्य फेरीतील आपला मार्ग सुकर करायचा आहे. टीम इंडियाने एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत पाकिस्तानकडून एकही सामना गमावलेला नाही, तर शेजारील देशाला सात वेळा पराभूत केले आहे. यावेळी भारताचे लक्ष्य आठवा विजय संपादन करण्याचे असेल. भारताने आपल्या विश्वचषक मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव केला होता. त्याचबरोबर अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही टीम इंडिया विजयाचा दावेदार मानली जात आहे.
भारताने अफगाणिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला
विश्वचषक २०२३ मध्ये भारताची विजयी मोहीम सुरूच आहे. आपल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा आठ विकेट्सने पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ गडी गमावून २७२ धावा केल्या. कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने ८० धावांची तर अजमतुल्ला उमरझाईने ६२ धावांची खेळी खेळली.