आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिसने आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी रचली. ही खेळी अगदी खास आणि अविस्मरणीय ठरेल असे जॅक कॅलिसने म्हटले आहे.
जॅक कॅलिस म्हणाला, “आपला हा शेवटचा सामना आहे याची पूर्वकल्पना घेऊन मैदानात उतरणे हा माझ्यासाठी वेगळाच अनुभव होता. यापुढे पुन्हा कधी देशासाठी खेळण्याची संधी मिळणार नाही हे माहित असताना शेवटच्या सामन्यात शतकी खेळी करण्याची ही शेवटची संधी आहे हे वाक्य मनात सतत येरझाऱया घालत होते. असेही कॅलिस म्हणाला”

Story img Loader