अमेरिकेच्या जिम्नॅस्टिक्स संघाचा माजी प्रमुख डॉक्टर लेरी नॅसर याला अनेक महिला खेळाडूंचा विनयभंग केल्याप्रकरणी मोठी शिक्षा झाली आहे. आपल्याकडे असलेल्या अशा ‘नॅसर’नाही असा धडा मिळेल?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘लेरी, आज तू आरोपीच्या जागेवर उभा आहेस याचे दु:ख तुला होत असेल, पण ते तुझ्याकडून आम्हाला मिळालेल्या दु:खापेक्षा अधिक नक्कीच नाही. आज मी न्यायालयाचे आभार मानते की त्यांनी तुझ्याविरोधात मला साक्ष देण्याची परवानगी दिली. तुझ्याबद्दल माझ्या मनात किती चीड आहे याची कल्पनाही तू करू शकत नाहीस. मी त्या अनेक महिला खेळाडूंचे अभिनंदन करू इच्छिते की ज्यांनी तुझ्याविरोधात उभे राहण्याचे धाडस दाखवले. माझ्यासारख्या त्यांनीही तुझ्यावर विश्वास दाखवला होता आणि तू त्या विश्वासाचे काय केलेस हे आज जगासमोर आले आहे. बाल्यावस्थेत असताना तू आम्हाला नको असलेल्या यातना दिल्यास. आमच्या अजाणतेपणाचा गरफायदा घेतलास. एक प्रशिक्षक म्हणून आम्ही, आमच्या प्रत्येकीच्या पालकांनी तुला गुरुस्थानी ठेवले. पण आता मी ती लहान मुलगी नाही जिच्या शरीराशी तू खेळलास. तेव्हा मला काहीच कळत नव्हते किंवा तुझ्या त्या वागण्याचा प्रतिकार करण्याची िहमत माझ्यात नव्हती. त्यामुळे तुझ्याबद्दल कोणतीच सहानुभूती नाही..’
अॅली रेसमन भर न्यायालयात लेरीची इभ्रत काढत होती. आपली चीड व्यक्त करताना तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण तिचा उच्चारलेला प्रत्येक शब्द हा बाणासारखा तीक्ष्ण होता. तो शब्द तिचा एकटीचा नव्हता तर अशा १५० हून अधिक अॅलींचा होता ज्यांच्या बाल्यावस्थेचा लेरी नॅसरने गरफायदा घेतलेला होता. ती बोलत होती आणि तिला ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर लेरी किती वासनांध होता हे उभं रहात होतं.
अमेरिकेच्या जिम्नॅस्टिक्स संघाचा माजी प्रमुख डॉक्टर लेरी नॅसर असा क्रूर असू शकतो याची कल्पना कुणीही केली नसेल. चेहऱ्यावरून तरी तो तसा असेल असे वाटतही नव्हते. आपल्या पदाचा गरवापर करून त्याने आत्तापर्यंत अनेक अजाण महिला खेळाडूंच्या शरीराशी खेळ केला. तो जाणीवपूर्वक करत असलेल्या स्पर्शाचा अर्थ त्या खेळाडूंनाही तेव्हा कळत नव्हता आणि ज्यांना तो कळला आणि ज्यांनी त्याला विरोध केला त्यांना गप्प कसे करायचे यात लेरी माहीर होता. लेरी विरोधात शंभराहून अधिक खेळाडूंनी लंगिक अत्याचाराची तक्रार न्यायालयात दाखल केली. सप्टेंबर २०१६ मध्ये लेरीविरोधात जाहीर तक्रार केल्यानंतर जवळपास २६५ महिला खेळाडू पुढे आल्या. त्यात अमेरिकेच्या जिम्नॅस्टिक्स संघाच्या माजी खेळाडू जेमी डॅनटेशर, जिनेट अँटोलीन, मॅकाय मॅरोनी, अॅली रेसमन, मॅगी निलोक्स, गॅबी डगलस, सिमोन बिलेस आणि जोर्डीन वेबर यांचा समावेश आहे. या अव्वल जिम्नॅस्टिक्सनाही लेरीच्या लंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला. क्रीडा इतिहासातील लंगिक अत्याचाराची ही सर्वात मोठी घटना आहे. लंगिक अत्याचाराच्या अनेक कलमांतर्गत लेरीला जवळपास १७५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सप्टेंबर २०१६ मध्ये ‘दी इंडियाना पोलीस स्टार’ या वृत्तपत्रात नॅसर विरोधात दोन माजी जिम्नॅस्टिक्सपटूंनी लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्याचे वृत्त छापून आले. त्या तक्रारीनंतर मिशिगन स्टेट युनिव्हर्सटिीने नॅसर यांना राजीनामा देण्यास सांगितले. नॅसरकडून सर्व हक्कही काढून घेतले गेले. त्यानंतर २५० खेळांडूनी नॅसरविरोधात तक्रारी दाखल केल्या. वैद्यकीय परीक्षणाच्या आडून नॅसर खेळाडूचे लैंगिक शोषण करत असे. असे आरोप यापूर्वीही त्याच्यावर झाले, परंतु प्रत्येक वेळी खेळाडू अल्पवयीन असल्याने नॅसर ते सहज धुडकावून लावायचा. तसा प्रयत्न त्याने याही वेळेला केला. ही कायदेशीर वैद्यकीय प्रक्रिया असल्याचा दावा त्याने केला. मात्र फेब्रुवारी २०१७ मध्ये जिनेट अँटोलीन, जेस्सिका हॉवर्ड आणि जेमी डॅनटेशर या माजी खेळाडूंनी ६० मिनिटांची प्रकट मुलाखत दिली आणि त्यात नॅसरच्या कुकर्माचा पाढा वाचला. ऱ्हचेल डेन्होलंडरने या प्रकरणाला प्रथम वाचा फोडली. ऑिलपिक सुवर्णपदक विजेत्या मॅकाय मॅरोनीने ती १३ वर्षांची असल्यापासून ते २०१६ मध्ये निवृत्त होइपर्यंत नॅसरने आपला विनयभंग केल्याचा आरोप केला. त्यानंतर अनेक आजीमाजी ऑिलपिकपटू समोर आल्या आणि त्यांनी नॅसरचे खरे रूप जगासमोर आणले.
भारतातही असे अनेक लेरी नॅसर आहेत आणि त्यांच्या या अत्याचारांना विरोध करणाऱ्या खेळाडूही आहेत. पण आपल्या समाजाची मानसिकता या गोष्टीचा स्वीकार करायला तयार होत नाही. आपल्या खेळाडूंनाही अशा यातना सहन कराव्या लागतात. पण काही वेळा समाजाच्या भीतीपोटी, घरच्यांच्या इभ्रतीसाठी आणि काही वेळा नाइलाज म्हणून महिला खेळाडू असे लैंगिक अत्याचार गपगुमान सहन करतात. ज्यांनी विरोधाचा सूर आळवला त्यांच्या कारकीर्दीचा शेवट कधी झाला हे कुणाला कळलंही नाही. मात्र ज्यांच्यावर आरोप झाले ते उजळ माथ्याने आजही बिनधास्तपणे समाजात वावरत आहेत. क्रीडा क्षेत्रातील हे भयाण सत्य आहे. नॅसरच्या रूपाने ते पुन्हा जगासमोर आले इतकेच.
भारतातील अशी प्रकरणे
महिला खेळाडूंवर लंगिक अत्याचार केल्यामुळे आंध्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव व्ही. चामुंडेस्वरनाथ यांना ऑगस्ट २००९ मध्ये आपले पद गमवावे लागले. संघात निवड करण्यासाठी हा इसम महिला खेळाडूंकडे लैंगिक संबंधांची मागणी करायचा, असे आरोप अनेक खेळाडूंनी केले. आपल्यावरील तक्रार मागे घेण्यात यावी यासाठी चामुंडेस्वरनाथने एका खेळाडूवर प्रचंड दडपणही आणले. सहा वर्षांनंतर त्या खेळाडूने आत्महत्या केली. मात्र तिच्या कुटुंबीयांनी तिच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारण असल्याचे सांगितले. चामुंडेस्वरनाथ सध्या तेलंगणा बॅडिमटन असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. रिओ ऑिलपिकमध्ये भारतासाठी अविस्मरणीय कामगिरी करणाऱ्या पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्यासह महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज यांना बीएमडब्ल्यूसारखी महागडी गाडी भेट देऊन चामुंडेस्वरनाथ पुन्हा चच्रेत आले होते.
भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधारानेही महिला संघाचे व्हिडिओग्राफर बसवराज आणि प्रशिक्षक एम. के. कौशिक यांच्या विरोधात मेलद्वारे तक्रार केली होती. जुल २०१० मधील या तक्रारीच्या पत्रावर ३० खेळाडूंनी स्वाक्षरी केली होती. त्यानंतर बसवराज यांची हकालपट्टी करण्यात आली आणि कौशिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जुल २०१३ मध्ये कौशिक यांची पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी चार महिन्यांकरिता नियुक्ती करण्यात आली. २०१४ मध्ये हॉकी इंडियाने त्यांना मध्य विभागाचे हाय परफॉर्मन्स व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले आणि सध्या ते भोपाळ हॉकी अकादमीच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र ज्या खेळाडूने विनयभंगाची तक्रार केली होती, ती भारताकडून पुन्हा कधीच खेळू शकली नाही.
तामिळनाडू बॉिक्सग असोसिएशनचे सचिव ए. के. करुणाकरन यांना महिला बॉक्सरचा विनयभंग केल्याप्रकरणी मार्च २०११ मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्या खेळाडूने बॉिक्सग सोडून किक बॉिक्सग आणि मिक्स मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली.
२०१४च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत कुस्ती पंच विरेंदर मलिकला महिला सहकाऱ्याचा शारीरिक छळ केल्याप्रकरणी अटक झाली होती.
जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक मनोज राण आणि खेळाडू चंदन पाठक यांच्यावर २०१४ मध्ये नवी दिल्ली येथील आयजीआय स्टेडियममध्ये महिला खेळाडूचा छळ केल्याचा आरोप आहे. त्या महिला खेळाडूवर तक्रार मागे घेण्यासाठी महासंघाकडूनही दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याची चर्चा होती. तरीही २०१७ पर्यंत राणा हे प्रशिक्षक म्हणून आयजीआय स्टेडियममध्ये कार्यरत होते.
भारताचे तिरंदाजी प्रशिक्षक सुनील कुमार यांना ऑक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या युवा विश्व तिरंदाजी अजिंक्यपद स्पध्रेतून माघारी पाठवण्यात आले. ब्रिटिश महिला खेळाडूंशी गरवर्तन केल्यामुळे त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली आणि अजूनही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई कायम आहे.
स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा