शेणाने सारवलेल्या मातीच्या भिंती, झावळ्यांचे छप्पर आणि घराला वृक्षांनी घातलेला वेढा. आसाममधील बहुतेक खेळाडूंच्या कुटुंबीयांच्या घराचे डोळ्यांसमोर उभे राहणारे चित्र. आर्थिक परिस्थितीशी त्यांचा संघर्ष हा कायमचाच. मात्र, पिढ्यानपिढी चालत आलेली ही ससेहोलपट मोडून काढण्यासाठी आता युवक पुढे सरसावले आहेत. त्यांना क्रीडा क्षेत्राने हात दिला आहे. येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साइ) केंद्रही युवकांना साथ देत आहेत. त्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे अनेक खेळाडू मिळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘‘वडील खासगी शाळेत शिक्षक आहेत, त्यांना कधी पगार मिळतो, तर कधी नाही. आई लहानसहान काम करून प्रपंच चालवते. ही परिस्थिती बदलायची असेल तर बॉक्सिंगमध्ये पदकांची कमाई करायला हवी. तसे करण्यात यशस्वी झाले, तर आणि तरच घरची परिस्थिती सुधारेल,’’ असे आसामची अंकुशिता बोरो सांगते. तिचे हे वाक्य येथील युवकांच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीचे प्रतीक आहे.

अंकुशिता हे नाव भारतीयांच्या आता चांगल्याच परिचयाचे झालेले आहे. गुवाहाटी येथे नुकत्याच झालेल्या जागतिक युवा महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत आसामच्या या खेळाडूने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. सुवर्णपदकाच्या या यादीत ज्योती, साक्षी, शशी आणि नीतू यांचीही नावे आहेत, पण या सगळ्या हरयाणाच्या. अंकुशिता या पाच सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंमध्ये उजवी ठरते. घरच्या पाठीराख्यांची ताकद तिच्या मागे होतीच, पण त्याहीपेक्षा तिची प्रबळ इच्छाशक्ती या यशामागची ऊर्जा आहे. आसामकडून आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हुकमत गाजवणारी आणखी एक खेळाडू मिळाली आहे. प्रशिक्षक राफेल बेर्गामास्को आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे उपाध्यक्ष एडगर टॅनर यांनीही तिचे भरभरून कौतुक केले. त्याहीपेक्षा गुवाहाटीची क्रीडा संस्कृती आणि क्रीडा विकासासाठी उभारलेल्या पायाभूत सुविधांचा अधिक गौरव झाला.  १९८२ला दिल्लीत झालेल्या आशियाई स्पर्धामुळे देशात मोठय़ा प्रमाणावर पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या. गुवाहाटीत या सुविधा पोहोचण्यासाठी पाच वर्षे लागली. याबाबत गुवाहाटीच्या साइ अकादमीचे संचालक डॉ. सुभाष बसुमतारी म्हणाले, ‘‘आसाममधील ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंची निवड करण्यासाठी ‘साइ’कडून चालवण्यात येणाऱ्या प्रतिभा शोध मोहिमेतून अनेक खेळाडू समोर आले. खेळाडूंच्या त्यांच्या कौशल्यानुसार खेळाची निवड करण्याची मुभा देण्यात आली आणि त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनही देण्याचे काम करण्यात आले.’’

डिंको सिंग (बॉक्सिंग), कुंजूराणी देवी (वेटलिफ्टिंग) या पूर्वाचल राज्यांतील खेळाडूंनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पध्रेत भारताला पदके मिळवून दिली. १९८८-८९ नंतर वैयक्तिक खेळावर अधिक भर देण्यात आला आणि त्यात कौशल्यानुसार खेळाडूला प्रोत्साहन दिले जाऊ लागले. खेळाडूची शरीरयष्टी आणि भौगोलिक पाश्र्वभूमी याचाही अभ्यास महत्त्वाचा ठरला.

‘‘पूर्वाचलातील मणिपूरमध्ये पहिले विभागीय केंद्र उभारले गेले. त्यामुळे  हॉकी, फुटबॉल, सायकलिंग, वेटलिफ्टिंगमध्ये येथे खेळाडू तयार झाले. १९९९मध्ये भारतात महिला बॉक्सिंग आले. २०००मध्ये हे प्रमाण वाढले. मेरी कोम ही पहिल्या टप्प्यातील खेळाडू, त्यानंतर सरिता देवी, आसाममधील कल्पना चौधरी उदयास आल्या. साइने बॉक्सिंगची सुरुवात केली. महिला खेळाडूंची अंकुशिताही साइ अकादमीची खेळाडू आहे. जमुना बोरो, मिनू बसुमतारी, प्विलाओ बसुमातारी हे आसामचे आहेत. कोक्राझार येथील अकादमीने तिरंदाजी आणि बॉक्सिंगचे आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले. प्रमिला देमारी, धनीराम बसुमातारी, मुकेश बोरो, संजय बोरो हेही आसामचे. शिवा थापाही गुवाहाटी अकादमीत सराव करायचा,’’ अशी खेळाडूंची नावे सांगताना  सुभाष बसुमतारी थकत नव्हते.

खेळाडूंची शोधमोहीम

  • प्रत्येक वर्षी प्रतिभा शोधमोहीम राबवली जाते. त्याची जाहिरातबाजी करण्यात येते आणि त्यासाठी राज्य संघटना, जिल्हा संघटना यांचेही सहकार्य घेतो.
  • प्रशिक्षकांसाठीही वर्ग भरवले जातात. साइचे अधिकारी वैयक्तिक लक्ष देऊन या मोहिमेत सहभागी होतात
  • मोहिमेअंतर्गत निवडलेल्या खेळाडूंना साइच्या नियमावलीतील चाचणीला सामोरे जावे लागते आणि त्यातील यशस्वी खेळाडूंना साइ केंद्रात सराव करण्यासाठी निवडले जाते.
  • १२ ते १५ वर्षांखालील खेळाडूंना अधिक प्राधान्य.
  • राज्य सरकारचे सहकार्य महत्त्वाचे
  • सर्वात महत्त्वाचे येथे स्त्री-पुरुष समानतेला अधिक महत्त्व आहे आणि त्यामुळे पुरुषांपेक्षा येथे महिला खेळाडूंचे प्रमाण अधिक आहे.

युवा बॉक्सिंग स्पर्धेतील यशानंतर गुवाहाटीला जगातील महत्त्वाच्या शहरांचे  स्थान मिळाले आहे. खेळाच्या विकासासाठी येथे अव्वल दर्जाच्या पायाभूत  सुविधा आहेत. आगामी काळात भारतातील क्रीडा क्षेत्राची राजधानी म्हणून गुवाहाटी ओळखले जाईल.   – सर्बानंद सोनोवाल, आसामचे मुख्यमंत्री

कल्पना चौधरी, मिनू बसुमतारी आणि प्विलाओ बसुमतारी, आसामच्या अनेक अव्वल दर्जाच्या बॉक्सिंगपटूंना मी प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी आपल्या कामगिरीने सर्वानाच प्रभावित केले. अंकुशितामध्येही वरिष्ठ संघात स्थान मिळवण्याचे कौशल्य आहे. शिवा थापासारखे तिलाही बॉक्सिंगसाठी एक वरदानच मिळाले आहे.   – भास्कर भट, राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक

गोलाघाट येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या उपकेंद्रात तीन वष्रे (२०१५ पर्यंत) मी प्रामाणिका बोरा यांच्याकडून बॉक्सिंगचे प्रशिक्षक घेतले. त्यांची गोलाघाट येथून बदली झाल्यानंतर २०१५ मध्ये मी गुवाहाटी येथील अकादमीत प्रवेश घेतला. तेथे त्रिडीब बोरा यांच्याशी माझी भेट झाली. त्यानंतर माझ्या बॉक्सिंग कारकीर्दीला वेगळे वळण मिळाले. त्यामुळे प्रामाणिका आणि त्रिडीब यांचे आभार मानते.   – अंकुशिता बोरो, जागतिक युवा स्पध्रेतील सुवर्णपदक विजेती

बिहू महोत्सवाचे क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान

आसाममध्ये राजेशाही घराण्यांचा पगडा जाणवतो. त्यांच्या काळापासून येथे बिहू महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाचेही तीन प्रकार आहेत. एप्रिलमध्ये होणारा रोंगाली किंवा बोहाग बिहू, ऑक्टोबरमधील कोंगाली किंवा काटी बिहू आणि जानेवारीत होणारा भोगाली किंवा माघ बिहू. या प्रत्येक प्रकाराचे एक वैशिष्टय़ आहे, परंतु हे तिन्ही महोत्सव खेळाच्या अगदी जवळचे आहेत. या महोत्सवात विविध खेळांचा सहभाग असतो आणि खेळाचा प्रसार करण्यासाठी त्याचा फार उपयोग होतो.

‘टॉप’ योजनेसाठी अंकुशिताची शिफारस

जागतिक युवा महिला बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक विजेत्या अंकुशिता बोरोची केंद्र सरकारच्या ‘टार्गेट पोडियम फिनिश (टॉप)’ या योजनेसाठी शिफारस करण्यात येणार असल्याचे सुभाष बसुमतारी यांनी सांगितले.

आसाममधील खेळाडू

भोगेश्वर बरुहा (अ‍ॅथलेटिक्स), अ‍ॅलेन डेओरी (फुटबॉल), अबू नचिम (क्रिकेट), दिपांकार भट्टाचार्जी (बॅडमिंटन), सोमदेव देववर्मन (टेनिस), अनुपमा शर्मा (कुस्तीपटू), अभिजित भट्टाचार्य (व्हॉलीबॉल), गौतम कलिता (शरीरसौष्ठव), गोकुळ शर्मा (क्रिकेट), मधुरीया बोराह (ट्रायथलॉन), जयंत तालुकदार (तिरंदाजी), दुर्गा बोरो (फुटबॉल), मोनालिसा बरुहा मेहता (टेबल टेनिस), शिवा थापा (बॉक्सिंग), महादेव डेका (शरीरसौष्ठव), होलीचरण नार्झरी (फुटबॉल), बाओरींगदाओ बोडो (फुटबॉल).

गुवाहाटी केंद्रातील सुविधा

  • फुटबॉलचे उत्तम मैदान
  • वेटलिफ्टिंग आणि बॉक्सिंगसाठी स्वतंत्र कक्ष
  • तायक्वांदो, ज्युदो, बॅडमिंटन, टेबल टेनिससाठी प्रशस्त सभागृह
  • अत्याधुनिक यंत्रणांची व्यायामशाळा