क्रीडामंत्री आशीष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे निकष व कार्यपद्धती सुधारण्यासाठी आणि यात सर्व क्रीडा प्रकारांचा अंतर्भाव व्हावा, म्हणून अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश गुरुवारी क्रीडामंत्री आशीष शेलार यांनी दिले.

Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
amit shah inaugurates 10000 newly formed multipurpose pacs
प्रत्येक गावात बहुउद्देशीय संस्थाच केंद्रीय सहकार मंत्र्यांची घोषणा, ३२ प्रकारच्या व्यवसायांची मुभा
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
Subsidy e-rickshaw Pimpri, Pimpri municipal corporation,
पिंपरी : ई-रिक्षाधारकांना ३० हजार रुपये अनुदान; काय आहे महापालिकेचा उपक्रम?
industry minister uday samant
हिंजवडी आयटी पार्कची कोंडी : उद्योगमंत्री उदय सामंत ‘ॲक्शन मोड’वर; अधिकाऱ्यांना दिले आदेश
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश

क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींना राज्य शासनातर्फे दर वर्षी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या पुरस्कारात सुधारणा करण्यासाठी ही समिती येत्या आठ दिवसांत स्थापन करण्यात यावी आणि या समितीला अहवाल देण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे, असे निर्देशही मंत्र्यांनी दिले आहेत.

समितीपुढील आव्हाने

* ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धाव्यतिरिक्त अन्य खेळांचाही समावेश करणे.

* आतापर्यंत ३९ क्रीडा प्रकार विचारात घेतले जात होते. यात आणखी काही क्रीडा प्रकारांचा समावेश करणे.

* ऑलिम्पिक क्रीडा प्रकारातील पुरस्कार चक्राकार पद्धतीने दिले जात होते. त्याऐवजी प्रत्येक वर्षी पुरस्कार देणे.

* गिर्यारोहणामध्ये शिखराची उंची निश्चित करणे.

* संघटक आणि एकलव्य पुरस्कारांबाबत निकष ठरवणे.

* सर्व  पॅरालिम्पिक  क्रीडा प्रकारांचा पुरस्कारांसाठी  विचार करणे.

* प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी वेब पोर्टल अद्ययावत करणे.

Story img Loader