क्रीडामंत्री आशीष शेलार यांचे निर्देश
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे निकष व कार्यपद्धती सुधारण्यासाठी आणि यात सर्व क्रीडा प्रकारांचा अंतर्भाव व्हावा, म्हणून अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश गुरुवारी क्रीडामंत्री आशीष शेलार यांनी दिले.
क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींना राज्य शासनातर्फे दर वर्षी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या पुरस्कारात सुधारणा करण्यासाठी ही समिती येत्या आठ दिवसांत स्थापन करण्यात यावी आणि या समितीला अहवाल देण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे, असे निर्देशही मंत्र्यांनी दिले आहेत.
समितीपुढील आव्हाने
* ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धाव्यतिरिक्त अन्य खेळांचाही समावेश करणे.
* आतापर्यंत ३९ क्रीडा प्रकार विचारात घेतले जात होते. यात आणखी काही क्रीडा प्रकारांचा समावेश करणे.
* ऑलिम्पिक क्रीडा प्रकारातील पुरस्कार चक्राकार पद्धतीने दिले जात होते. त्याऐवजी प्रत्येक वर्षी पुरस्कार देणे.
* गिर्यारोहणामध्ये शिखराची उंची निश्चित करणे.
* संघटक आणि एकलव्य पुरस्कारांबाबत निकष ठरवणे.
* सर्व पॅरालिम्पिक क्रीडा प्रकारांचा पुरस्कारांसाठी विचार करणे.
* प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी वेब पोर्टल अद्ययावत करणे.