क्रीडा विकास मसुदा ठरविण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने बारा सदस्यांचा कार्यकारी गट स्थापन केला आहे. २०११ मध्ये हा मसुदा तयार करण्यात आला होता. मात्र त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यामुळे पुन्हा हा मसुदा तयार केला जाणार आहे.
 विविध खेळांच्या महासंघाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी व चांगल्याप्रकारे व्यवस्थापन होण्यासाठी हा मसुदा केला जात आहे. त्याकरिता न्यायाधीश मुकुल मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी गट तयार करण्यात आला आहे. या गटात राहुल मेहरा, विधुस्पत सिंघानिया, अभिनव बिंद्रा, बोरिया मुजुमदार, नरेंद्र बात्रा, बी.व्ही.पी.राव, सयन चटर्जी, विरेन रस्कीन्हा, केंद्रीय क्रीडा सहसचिव, क्रीडा संचालक आदींचा समावेश आहे.
मसुद्यास अंतिम मंजुरी देण्यापूर्वी विविध खेळाडू, संघटक, प्रशिक्षकांशी चर्चा केली जाणार आहे. क्रीडा विकास मसुद्यानुसार नियमावली ठरविण्यात येत असून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. क्रीडा निवडणूक आयोग, लवाद समिती आदी विविध समित्यांची नियुक्ती केली जाणार आहे.  

Story img Loader