आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारताच्या कनिष्ठ व वरिष्ठ स्तरावरील खेळाडूंच्या आहार भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने घेतला आहे.
वरिष्ठ खेळाडूंना दररोज ४५० रुपयांऐवजी ६०० रुपये दिले जाणार आहेत. कनिष्ठ व सबज्युनिअर खेळाडूंना दररोज ४५० रुपये दिले जातील. हेवीवेट व मिडलवेट ताकदीच्या खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना प्रतिदिन ७०० रुपये दिले जाणार आहेत. शारीरिक क्षमता, सांघिक, स्प्रिंट व कमी ताकदीच्या खेळांकरिता ४०० रुपयांचे मानधन दिले जाईल. अन्य कौशल्याच्या खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना प्रतिदिन ३०० रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे. क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे, की खेळाडूंना पूरक आहाराकरिता कोणते पदार्थ द्यावेत याचा निर्णय भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) घ्यावयाचा आहे. प्रत्येक खेळाडूची वैद्यकीय चाचणी घेऊन त्याला कोणता आहार योग्य आहे हे ठरवून त्यानुसार आहार दिला जाणार आहे. अनेक वेळा साई संस्थेने ठरविलेल्या आहारापेक्षा अन्य पूरक पदार्थ खेळाडू घेत असतात. हे पदार्थ अव्वल दर्जाचे असतील तर असे पदार्थ साईतर्फे दिले जावेत, अशीही सूचना करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा