योगा या क्रीडा प्रकाराला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आपल्या प्राधान्य खेळांमध्ये स्थान दिले आहे. मंत्रालयाने आर्थिक साहाय्याकरिता विविध खेळांच्या मान्यतेबाबत आढावा घेतला. त्यानुसार तलवारबाजी या खेळास सर्वसाधारण क्रीडा प्रकारांमध्ये स्थान दिले आहे. या खेळातील भारतीय खेळाडूंची प्रगती पाहून त्यास प्राधान्य खेळांमधील विद्यापीठ क्रीडा प्रकारात स्थान दिले आहे. विविध खेळांना कोणत्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे याचा तपशील संबंधित खेळाच्या राष्ट्रीय संघटनेबरोबरच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीलाही कळविण्यात आले आहे.
ऑलिम्पिक, आशियाई, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आदी महत्त्वपूर्ण स्पर्धामधील वैयक्तिक खेळांमध्ये आठव्या क्रमांकावर असलेल्या तर सांघिक खेळांमध्ये दहाव्या क्रमांकावर भारतास स्थान असेल तर अशा खेळांना मंत्रालयाने सर्वसाधारण खेळांच्या यादीत स्थान दिले आहे. या खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धा, प्रतिवर्षी एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा, वरिष्ठ व कनिष्ठ गटाच्या संघांना एका परदेश दौऱ्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे मंत्रालयाने निश्चित केले आहे.
क्रीडा मंत्रालयाच्या प्राधान्य क्रीडा प्रकारात योगा खेळास स्थान
योगा या क्रीडा प्रकाराला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आपल्या प्राधान्य खेळांमध्ये स्थान दिले आहे. मंत्रालयाने आर्थिक साहाय्याकरिता विविध खेळांच्या मान्यतेबाबत आढावा घेतला.
First published on: 02-09-2015 at 12:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sports ministry recognizes yoga as sports discipline