खेळाने आपल्याला मिळवून दिलेली कीर्ती व आर्थिक स्थैर्य लक्षात ठेवूनच ज्येष्ठ अॅथलेट्सनी आगामी कुमारांची जिल्हा मैदानी स्पर्धेस आर्थिक सहकार्य केले आहे. गुरुबन्स कौर, स्नेहल खैरे, सोनिया शिंदे, दत्ता सरडे, शिवाजीराव बुचडे, अनिल पवार, अॅड. सुशील मंचरकर या ज्येष्ठ खेळाडूंनी ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे. ही स्पर्धा येथे २६ ते २९ जून या कालावधीत सणस मैदानावर होणार आहे. ही स्पर्धा १४, १६, १८ व २० वर्षांखालील मुले व मुली या गटांत होणार आहे. या स्पर्धेत ४० संघांचे ६५० खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामध्ये अर्चना आढाव, अंकिता गोसावी, सिद्धी हिरे, मानसी पेंढारकर या आंतरराष्ट्रीय खेळाडू, सुमीत जैस्वाल, अफताब आलम, सर्फराझ नवाझ, चंद्रकांत झगडे, जुईली बधे, चारुशीला चिंचकर आदी राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेतून आगामी राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघांची निवड केली जाणार आहे. निवड समितीत सुधांशु खैरे, निवृत्ती काळभोर, रेश्मा पाटील-व्हनमाने, हर्षल निकम, भाग्यश्री शिर्के यांचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा