वर्षांनुवर्षे तेच पदाधिकारी आणि तीच माणसे असे चित्र भारतातील विविध क्रीडाविषयक संघटना आणि संस्थांमध्ये दिसून येते. ही मंडळी नवीन काही करीत नाहीत. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात देशाची पीछेहाट होत आहे, अशी खंत प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांनी व्यक्त केली.
‘‘आतासारख्या क्रीडाविषयक सोयीसुविधा आपणास त्यावेळी मिळाल्या असत्या तर येत्या १०० वर्षांत आपला विक्रम कोणी मोडला नसता, अशी कामगिरी आपण करून ठेवली असती,’’ असेही ते म्हणाले. ठाण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, ‘‘क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल यश मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या हौशी, होतकरू क्रीडापटूंना सर्वतोपरी सहकार्य करण्यास शासन तयार असते. पण यश मिळविण्यासाठी जी मेहनत, कष्ट घेण्याची तयारी क्रीडापटूंनी घेणे आवश्यक आहे, त्यामध्ये आपण थोडे कमी पडतो. वतनदारासारखे ठाण मांडून बसलेली मंडळी चाकोरी पद्धतीने संस्था चालवतात. त्यामुळे ना संघटनेचा विकास होत, ना तेथील क्रीडापटूला चांगले मार्गदर्शन मिळत. या सर्व गोंधळात तेथील क्रीडापटूंचे मात्र अतोनात नुकसान होते. याची फळे आपण भोगत आहोत.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा