चारुता गोखले – response.lokprabha@expressindia.com
अर्धे आकाश

४०० मीटर ते १००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला धावपटूंच्या शरीरात टेस्टोस्टेरोनचे प्रमाण जास्त असेल तर त्यांना महिलांच्या गटात खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

इंदिरा गांधी यांना मंत्रिमंडळातील एकमेव पुरुष असे म्हणले जायचे. फक्त मुली असणारे दाम्पत्य ‘या आमच्या मुली नाहीत तर मुलगेच आहेत’, असे अभिमानाने म्हणतात! मुलगे दणकट, मुली नाजूक, मुलगे धीट, मुली घाबरट, मुलगे आक्रमक, मुली मवाळ, मुलगे ठाम, मुली पडखाऊ! समजा मुली दणकट, धीट, आक्रमक आणि ठाम असतील तर? त्यांना पुरुषी म्हटले जाते आणि पुरुष नाजूक, घाबरट, मवाळ आणि पडखाऊ वृत्तीचे असतील तर त्यांना बायकी म्हटले जाते. हे हट्टाग्रह मनात बाळगत समाज अनेक र्वष पुढे जात आहे. पुरुषांमधील पुरुषपण आणि स्त्रीमधील स्त्रीपण म्हणजे नेमके काय? ते कोण ठरवते? कशाच्या आधारे ठरवले जाते? ती एक संकल्पना आहे की त्रिकालाबाधित सत्य? एरवी या प्रश्नांची उत्तरे देण्याच्या फंदात फारसे कुणी पडत नाही पण या संकल्पनांना जेव्हा कायद्याचे अधिष्ठान देण्याची गरज उत्पन्न होते, त्यावेळी त्याकडे वस्तुनिष्ठपणे पाहणे आवश्यक ठरते. आज हा मुद्दा चíचला जाण्याचे निमित्त ठरले आहे, द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन्स (IAAF) ने दिलेला एक निर्णय. या निर्णयानुसार ४०० मीटर ते १००० मीटर धावण्याच्या स्पध्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला धावपटूंच्या शरीरात टेस्टोस्टेरोन (testosterone) या संप्रेरकाचे प्रमाण पाच नॅनो mol/liter पेक्षा जास्त असेल तर त्यांना महिलांच्या गटात खेळण्यावर बंदी आणण्यात आली आहे. या चाचणीला इंग्रजीमध्ये सेक्स व्हेरिफिकेशन टेस्ट म्हणले जाते. अशा महिलांसमोर फेडरेशनने दोन पर्याय ठेवले. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीद्वारा टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करून महिलांच्या गटात खेळावे अथवा थेट पुरुषांच्या चमूत सहभागी व्हावे. थोडक्यात संप्रेरकाचे प्रमाण अधिक असल्यास महिला ही ‘स्त्री’ नसून पुरुष आहे असे फेडरेशन सांगते. यात आम्ही कुणावरही अन्याय करत नसून प्रत्येकाला आपला खेळ सादर करण्याची समान संधी उपलब्ध करून देत आहोत असे फेडरेशनचे म्हणणे आहे. टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक स्नायूंमधील बळ वाढवण्यासाठी उपयुक्त असते आणि निसर्गत:च ते पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येते असा समज आहे. २००९ मध्ये साऊथ आफ्रिकेच्या कॅस्टर सेमेन्या या धावपटूला सेक्स व्हेरिफिकेशन टेस्ट करायला भाग पाडण्यात आले. चाचणी केल्यावर तिच्यातील संप्रेरकाची मात्रा ही स्त्रियांमधील सरासरीपेक्षा अधिक आढळली आणि तिच्या पुढच्या वाटचालीत अडथळे निर्माण झाले.

yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
hundred liver transplants at New Era Hospital in nagpur
अवयव दानाला बळ… मध्य भारतातील एकाच रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाचे शतक
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता

ऑलिम्पिक स्पर्धाच्या इतिहासात घडलेली ही पहिली घटना नाही. अशा चाचण्या १९६० पासून अस्तित्वात आहेत. २०१४ मध्ये भारतीय धावपटू द्युति चांदला अशाच प्रकारच्या चाचण्यांना सामोरे जावे लागले होते. तिने केलेल्या टेस्टमध्ये ती ‘महिला’ नसल्याचे सिद्ध झाले आणि तिला कॉमनवेल्थ आणि आशियाई स्पध्रेत सहभाग घेण्यास मज्जाव करण्यात आला. कोर्टात धाव घेऊन तिने या निर्णयाला आव्हान दिले. ही चाचणी अपुऱ्या पुराव्यांच्या आधारे खेळाडूंवर लादली जात असल्याचे कोर्टाने सांगितले आणि द्युतीला खेळण्यास परवानगी देण्यात आली. तसेच या तज्ज्ञांना याविषयी अधिक ठोस शास्त्रीय पुरावे गोळा करण्याचेही आवाहन करण्यात आले. दरम्यान अनेक प्रयोगांमध्ये प्रचलित गृहितकांना छेद देणारी वेगवेगळी निरीक्षणे समोर आली. एकूण १५ वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळणाऱ्या ६९३ खेळाडूंच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण तपासण्यात आले. जवळजवळ १६ टक्के पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण हे सरासरीपेक्षा खूप कमी होते, काहींच्या बाबतीत ते मोजताही येणार नाही इतके सूक्ष्म होते तर १३ टक्के स्त्री खेळाडूंमध्ये या संप्रेरकाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक होते. तसेच एखाद्या महिला खेळाडूंमध्ये टेस्टोस्टेरॉनचे  प्रमाण अधिक असल्यास खेळाच्या कामगिरीमध्ये ती तिच्या सहकाऱ्यांच्या तुलनेत वरचढ ठरते (performance advantage) हेही प्रयोगाअंती सिद्ध झाले नाही. परंतु हे सर्व निष्कर्ष बेदखल करत येत्या नोव्हेंबरपासून फेडरेशनने हा नियम लागू करण्याचे ठरवले आहे. यास हायपरअ‍ॅन्ड्रोगेनिझम रूल (Hyperandrogenism rule) असेही म्हणतात. ऑलिम्पिकच्या ८०० मी. धावण्याच्या स्पध्रेत दोन वेळा चाम्पियनपद पटकवलेल्या कॅस्टर सेमेन्याला या निर्णयाचा या खेपेलाही फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वरील घटना वाचून असंख्य प्रश्न मनात येतात. एखाद्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठीची समान संधी ज्याला इंग्रजीमध्ये लेव्हल प्लेईंग फिल्ड असे म्हणतात, त्याची व्याख्या नेमकी कशी करायची? एखाद्या खेळाडूतील काही निसर्गदत्त जनुकीय गुणधर्म जर त्याला इतर खेळाडूंच्या तुलनेत वरकरणी वरचढ ठरवत असतील (performance advantage) तर तो इतरांवर अन्याय ठरू शकतो का? तो गुणधर्म ‘असमान संधी’ निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतो का? स्त्रीला स्त्रीचा आणि पुरुषाला पुरुषाचा ठप्पा लावणारा पाच नॅनो mol/liter टेस्टोस्टेरॉनचा जादुई आकडा नेमका आला कुठून? या संप्रेरकाची कमी अधिक मात्रा ही वास्तवात खेळाडूला जिंकवून किंवा हरवून देण्यास कितपत कारणीभूत आहे? याला काही सबळ शास्त्रीय पुरावे आहेत का? या प्रश्नांची उत्तरे एकमेकांत गुंतलेली आहेत व ती सावकाश मोकळी करावी लागतील.

कोणत्याही क्रीडाप्रकारात प्रतिस्पर्धी गटातील प्रत्येक खेळाडूचे गुणधर्म एकसमान नसतात. ते तसे असणे अपेक्षितही नाही. प्रत्येकाची उंची, हातापायांची लांबी वेगवेगळी असते. स्नायूंमधील शक्तीही सारखी नसते. सचिन तेंडुलकर फलंदाजी करताना गोलंदाज म्हणून माझ्यासमोर सहा फूट उंचीचा शोएब अख्तर नको असे म्हणत नाही. शोएब अख्तरला यामुळे परफॉर्मन्स अ‍ॅडव्हान्टेज मिळतो असंही सचिन म्हणत नाही. पोहण्याच्या स्पध्रेत हात लांब असणाऱ्या खेळाडूंची एक टीम आणि आखूड हात असणाऱ्यांची स्वतंत्र टीम नसते. किंबहुना खेळाडूंमधील हीच विविधता खेळास लज्जत आणते. जन्मत:च काही गुणवैशिष्टय़ घेऊन आलेली व्यक्ती ही अपवादात्मक ठरू शकते, परंतु ती विशिष्ट जनसमूहाचे प्रतिनिधित्व करत नाही हे विधान नक्कीच अशास्त्रीय ठरते. आणि त्याआधारे ‘समान संधी’ निर्माण करण्याचा प्रयत्न हा प्रत्यक्षात अधिक अन्याय्य ठरतो.

खेळाच्या सामन्यात शरीरातील फक्त टेस्टोस्टेरॉन हा एकमेव घटक खेळाडूची हार जीत ठरवत नाही. खेळाडूचा अनेक वर्षांचा सराव, त्याचा आहार, व्यायाम, जिंकण्याची तीव्र इच्छा, त्यामागील त्याची मानसिकता, बुद्धिमत्ता, भावनिक मन:स्थिती या सर्व गोष्टींचा एकत्रित प्रभाव त्याच्या कामगिरीवर पडत असतो. गेल्या १० ते १५ वर्षांत स्पोर्ट्स न्युट्रिशन आणि स्पोर्ट्स सायकॉलॉजी या स्वतंत्र ज्ञानशाखा बहरू लागल्या आहेत. यातच त्यांचे क्रीडाक्षेत्रातील महत्त्व अधोरेखित होते. अशा किती घटकांच्या चाळण्या लावून आणि समान संधीचा आभास निर्माण करून खेळाडू आपल्या जिंकण्याची शक्यता वाढवू शकतील? हे एका अर्थी केलेले मॅच फिक्सिंग नाही का? हीच रेष पुढे ओढायची ठरवली तर खरं तर प्रतिस्पर्धी खेळाडूंमधील आíथक स्तरही समसमान असायला हवा. कारण अंतिमत: खिशात पसे खुळखुळत असतील तरच खेळाडूला पोषक आहार आणि अधिक सराव हे सर्व परवडू शकते.

सेक्स व्हेरिफिकेशन टेस्ट आणि स्त्रीला िलग बदलायला लावण्याच्या या नियमाचा मानवी चेहरा विसरून चालणार नाही. वयाची १८ र्वष समाजात मुलीचे शरीर आणि भावना घेऊन वावरणाऱ्या स्त्रीवर एका चाचणीनंतर तू स्त्री नसून पुरुष आहेस असा आरोप करणे हे नीतिमत्तेला कितपत धरून आहे? याचा महिला खेळाडूच्या स्वप्रतिमेवर, आत्मविश्वासावर आणि पुढील दोन र्वष घ्याव्या लागणाऱ्या औषधाचा खेळातील कामगिरीवर जो परिणाम होतो, त्याची जबाबदारी कोण घेणार? आणि ही सगळी उठाठेव का? तर एखादीची खेळातील कामगिरी अपेक्षेपेक्षा अधिक नेत्रदीपक होते आणि ती तिच्या स्त्री सहकाऱ्यांच्या नेत्रात खुपते. निव्वळ या निरीक्षणावर स्त्री खेळाडूला आपले स्त्रीपण सिद्ध करण्याच्या अशास्त्रीय कसोटय़ांमधून जावे लागते. हा कुठला न्याय?

आणि हो, पुरुष खेळाडूंनी आम्हालाही ‘समान संधी’ हवी अशी आरोळी ठोकल्याची इतिहासात नोंद आहे का? पुरुष खेळाडूंच्या चमूमध्ये एखाद्या खेळाडूची कामगिरी लक्षणीय ठरली आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यातील टेस्टोस्टेरॉनचा मुद्दा पुढे केला आहे असे आठवते का? शरीरात संप्रेरकाच्या मात्रा सरासरीपेक्षा अधिक असल्यास पुरुष खेळाडूला चमूच्या बाहेर पडण्याचे आदेश देण्याचे धाडस फेडरेशन करेल का? नक्कीच नाही. आणि ही मात्रा सरासरीपेक्षा कमी असल्यास त्याला काय महिलांच्या गटात पाठवावे? सगळेच अताíकक! मुळात असा पुरुष जेंडर आयडेंटिफिकेशन टेस्ट करण्यास तयार होईल का हाही प्रश्न आहेच! ही सगळी अरेरावी फक्त महिला खेळाडूंबरोबरच! ‘ऑल आर विमेन बट सम आर लेस विमेन’ असे भासवण्याचा हा बाष्कळ प्रयत्न आहे हे मात्र खरे!
सौजन्य – लोकप्रभा

Story img Loader