टेक्सास खुल्या स्क्वॉश स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे दीपिका पल्लिकलचे स्वप्न अधुरेच राहिले. अंतिम लढतीत इजिप्तच्या १८ वर्षीय नौर इल शेरबिनीने दीपिकावर ११-७, ११-५, ११-७ असा विजय मिळवत सनसनाटी विजय मिळवला. कारकिर्दीतील पहिल्या मोठय़ा स्पर्धेच्या जेतेपदापासून अवघा एक विजय दूर असलेल्या दीपिकाला अंतिम सामन्यात मात्र सूर गवसला नाही. अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात दीपिकाने आठव्या मानांकित मॅडेलिन पेरीला नमवत खळबळजनक विजय मिळवला होता. दुसरीकडे पात्रता फेरीचा अडथळा पार करत मुख्य फेरीत दाखल झालेल्या शेरबिनीने तीन मानांकित खेळाडूंना गाशा गुंडाळायला लावला.

Story img Loader