भारताच्या दीपिका जोसेफ व जोश्ना चिनप्पा या गुणवान खेळाडूंनी टोरांटो ग्रेनाईट ओपन स्क्वॉश स्पर्धेतील एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. दीपिका या तृतीय मानांकित खेळाडूने वेल्स संघाच्या तेस्नी इव्हान्स हिला ८-११, ११-८, ११-५, ११-७ असे हरविले. तिची आता इंग्लंडच्या जेनी डुंकाल्फ हिच्याशी गाठ पडणार आहे. दीपिकाच्या तुलनेत जोश्नाने सहज विजय मिळविला. तिने कॅनडाची खेळाडू निक्की टॉड हिचे आव्हान ११-८, ११-८, ११-६ असे संपुष्टात आणले. तिला ऑस्ट्रेलियाच्या रॅचेल ग्रीनहॅम हिच्याशी झुंज द्यावी लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Squash dipika pallikal joshna chinappa reach quarters in toronto