मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने आज (शनिवार) ‘स्पॉट फिक्सिंग’ प्रकरणी सोफीटेल हॉटेलवर छापा टाकला. राजस्थान रॉयल संघाच दोषी खेळाडू श्रीशांत आणि बुकी जीजू जनार्दन याच हॉटेलमध्ये एकाच रूममध्ये मुक्कामी होते, अशी माहिती विश्वास रॉय यांनी दिली. समोर आली आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमधून श्रीशांतचं सामानही जप्त करण्यात आलं आहे. त्यामध्ये श्रीशांतचा लॅपटॉप, मोबाईल आणि आयपॅड यांचा समावेश आहे. त्याचबरोबर १०२ मोबाईल, २ लॅपटॉप आणि २ लाख ३० हजार रूपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाने पाडूरंग कदम, प्रवीण डेरा, निरज शाह या सट्टेबाजांना अटक केली आहे. सट्टेबाजांचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, याचा पोलिस शोध घेत आहेत.
मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये श्रीशांतविरोधातील अनेक सबळ पुरावे समोर आले आहेत. हॉटेलच्या रूममधून एक डायरीही जप्त करण्यात आली असून, ती श्रीशांतची असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. श्रीशांत राहत असलेल्या फाईव्ह स्टार हॉटेलची रूम श्रीशांतच्या नावावर बुक असल्याचेही उघड झाले आहे. पोलिस हॉटेलच्या सीसीटिव्ही फुटेजचीही तपासणी करणार आहेत. 

Story img Loader