SRH buy second most expensive player in IPL Pat Cummins : ऑस्ट्रेलियन संघाला एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये चॅम्पियन बनवणारा कर्णधार पॅट कमिन्सने आयपीएल २०२४ लिलावात इतिहास रचला. तो आतापर्यंत विकला जाणारा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. या लिलावात सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सला विकत घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पॅटसाठी सनरायझर्स हैदराबादला २० कोटी ५० लाख रुपये मोजावे लागले. आरसीबीनेही आटोकाट प्रयत्न केले, पण या संघाने आपली पर्स लक्षात घेऊन हैदराबादसमोर शरणागती पत्करली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॅट कमिन्सची मूळ किंमत २ कोटी रुपये होती आणि तो सुरुवातीला सर्वात महाग विकला जाणारा खेळाडू होता, परंतु नंतर त्याच्या संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने त्याचा विक्रम मोडला. त्याला केकेआरने २४ कोटी ७५ लाख रुपयांना विकत घेतले. आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात कमिन्स आणि स्टार्क हे दोनच खेळाडू आहेत, ज्यांना संघाने २० कोटींहून अधिक रुपयांना विकत घेतले आहे.

२०२० मध्ये कमिन्स ठरला होता सर्वात महागडा –

आयपीएल २०२४ च्या लिलावाच्या सुरुवातीला पॅट कमिन्सला हैदराबादने २० कोटी ५० लाख रुपयांना विकत घेतले. त्यामुळे असे वाटत होते की, तो आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे, परंतु मिचेल स्टार्कने काही काळानंतर त्याचा विक्रम मोडला. अर्थात, या हंगामात पॅट कमिन्स सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे, परंतु २०२० मध्ये तो सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्या हंगामात पॅट कमिन्सला केकेआरने १५ कोटी ५० लाख रुपयांना विकत घेतले होते.

हेही वाचा – IPL Auction 2024: ट्वेन्टी२० यशासाठी वनडेचा उतारा; कमिन्स-स्टार्क मिचेल- रवींद्र-गेराल्ड यांना संघांचं प्राधान्य

पॅट कमिन्स हा आयपीएल २०२२ मध्ये केकेआर संघाचा भाग होता. त्याला या संघाने ७.२५ कोटी रुपयांना विकत घेतले, परंतु नंतर त्याला सोडून दिले. तो २०२३ साली आयपीएलमध्ये खेळला नव्हता, परंतु यावेळी त्याच्या संघाला एकदिवसीय विश्वचषकात विजय मिळवून दिल्यानंतर त्याची मागणी वाढली. त्यामुळे तो हैदराबादकडून खेळताना दिसणार आहे.

हेही वाचा – IPL 2024 Auction: स्टीव्ह स्मिथ, मनीष पांडे आणि करुण नायर राहिले अनसोल्ड; पुढच्या फेरीत लागेल का बोली? जाणून घ्या

कमिन्सची आयपीएलमधील कामगिरी –

कमिन्सच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने या लीगमधील ४२ सामन्यांत ४५ बळी घेतले आहेत. ३४ धावांत ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. कमिन्स २०१४ मध्ये पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळला होता आणि यावेळी त्याला फक्त एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि त्याला फक्त एक विकेट मिळाली होती. त्याने आतापर्यंत ३७९ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ६६ धावा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srh buy second most expensive player in ipl pat cummins in ipl 2024 auction vbm
Show comments