सनराइजर्स हैदराबाद संघाचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे औपचारिक सामन्यात उलटफेर करण्याखेरीज हैदराबादकडून कोणतीही अपेक्षा नाही. कोलकाता विरुद्धच्या सामन्यातही हैदराबादला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. यापूर्वी हैदराबादच्या निराशाजनक कामगिरीमुळे डेविड वॉर्नरला कर्णधारपदावरून दूर करण्यात आलं होतं. तर न्यूझीलंडच्या केन विलियमसनला कर्णधारपद देण्यात आलं आहे. बदल करून करूनही हैदराबादच्या कामगिरीत तसा काही फरक झाला नाही. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातही वॉर्नरची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. त्यामुळे त्याला प्लेईंग इलेव्हन बाहेर करण्यात आलं. अशातच रविवारी झालेल्या कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्यावेळी माजी कर्णधार डेविड वॉर्नरने स्टँडमध्ये बसून संघाचं समर्थन करताना दिसला. हातात सनराइजर्स हैदराबादचा झेंडा घेऊन संघाचं मनोबल वाढवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डेविड वॉर्नर गेल्या दोन सामन्यात हैदराबाद संघासोबत नाही. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर केलं होतं. तेव्हाही वॉर्नर मैदानात उपस्थित नव्हता. मात्र कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात डेविड वॉर्नर फ्रेंचाइजीची जर्सी घालून हातात झेंडा घेऊन समर्थन करताना दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

वॉर्नरचा सनराइजर्स हैदराबादशी असलेलं नात आयपीएल १४ व्या पर्वात संपुष्टात आलं आहे. यापूर्वीच्या ६ पर्वात वॉर्नरने सनराइजर्स हैदराबादसाठी खूप धावा केल्या. प्रत्येक पर्वात त्याने ५०० हून अधिक धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे हैदराबाद संघाला चांगलाच फायदा मिळाला. मात्र आयपीएल २०२१ पर्वातील ८ सामन्यात वॉर्नरने १०७.७३ सरासरीने १९५ धावा केल्या. यावेळी त्याने दोन अर्धशतकं केली.