आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा पुढच्या महिन्यापासून यूएईमध्ये सुरू होणार आहे, पण त्याआधी सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने त्याच्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. संदीप शर्माने त्याची गर्लफ्रेंड नताशा सात्विकशी लग्न केले आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने आपल्या ट्विटर हँडलद्वारे ही माहिती दिली.

सनरायझर्स हैदराबादने संदीप शर्मा आणि नताशा सात्विकच्या लग्नाचे फोटो शेअर करताना म्हटले, ”SRH कुटुंबात एका खास व्यक्तीची एंट्री, मोठ्या भागीदारीसाठी श्री आणि सौ शर्मा यांचे अभिनंदन.” लग्नात संदीपने दाक्षिणात्य पोशाख परिधान केला. त्याने पांढऱ्या रंगाची धोती आणि कुर्ता घातला, तर नताशाने केशरी-लाल सावलीची कांजीवरम साडी नेसली आहे.

 

संदीप शर्माने आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात हैदराबादसाठी फक्त तीन सामने खेळले, ज्यामध्ये त्याने १०९ धावा देऊन फक्त एक बळी घेतला. आता लग्नानंतर त्यांचे नशीब किती चमकते हे पाहावे लागेल.

 

हेही वाचा – हृदयरोगाशी झुंजणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गज क्रिकेटपटूची प्रकृती सुधारली

सनरायझर्स हैदराबाद संघ आयपीएल २०२१ साठी ३१ ऑगस्टला यूएईला रवाना होईल. सध्याच्या मोसमात या संघाची कामगिरी खूपच खराब झाली आहे, हैदराबादने ७ पैकी फक्त एक सामना जिंकला आहे आणि गुणतालिकेत ते तळाशी आहे.

Story img Loader