SA vs SL 1st Test Day 2 Updates in Marathi: श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या कसोटीतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा संघ १३.५ षटकांत अवघ्या ४७ धावांवर सर्वबाद झाला आहे. श्रीलंकेची ही कसोटीतील सर्वात कमी धावसंख्या आहे. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज मार्काे यान्सने गोलंदाजीत कहर करत १३ धावा देत ७ विकेट्स घेतल्या. श्रीलंकेचा फक्त एकच फलंदाज दुहेरी आकडा गाठण्यात यशस्वी ठरला.
यापूर्वी, श्रीलंकेच्या संघाची किमान कसोटी धावसंख्या ७१ होती. १९९४ मध्ये पाकिस्तानने श्रीलंकेला ७१ धावांवर कसोटीत सर्वबाद केले होते. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यानसेनने ७ विकेट घेत उत्कृष्ट कामगिरी केली आणि श्रीलंकेच्या संघाला पुनरागमनाची संधी दिली नाही. तर कागिसो रबाडाने १ आणि गेराल्ड कुत्सियाने २ विकेट घेतल्या. मार्को यान्सने जादुई गोलंदाजी करत ६.५ षटकांत अवघ्या १३ धावा देत ७ विकेट्स पटकावल्या. यान्सनची ही कसोटीतील सर्वाेत्कृष्ट कामगिरी आहे.
श्रीलंकचे फक्त २ फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. कामिंदू मेंडिसने सर्वाधिक १३ धावा केल्या आणि लाहिरू कुमाराने नाबाद १० धावा केल्या. ५ फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. दिनेश चंडिमल, कुसल मेंडिस, प्रभात जयसूर्या, विश्वा फर्नांडो आणि असिथा फर्नांडो खाते न उघडताच बाद झाले. याशिवाय प्रथुम निसांकाने ३ दिमुथ करुणारत्ने २, अँजेलो मॅथ्यूजने १ आणि कर्णधार धनंजय डी सिल्वाने ७ धावा केल्या. श्रीलंकेच्या एकूण ४२ धावांपैकी ६ धावा नो बॉल, वाइड आणि बाय मधून आल्या.
डर्बनमध्ये खेळवल्या जात असलेल्या या कसोटी सामन्याची नाणेफेक श्रीलंकेने जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय पहिल्या डावात संघाच्या पथ्यावरही पडला. कारण श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेला ४९.४ षटकांत १९१ धावांवर सर्वबाद केले होते. ज्यामध्ये श्रीलंकेचे वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो आणि लाहिरू कुमाराने प्रत्येकी ३ तर विश्वा फर्नांडोने २ विकेट घेतले होते. तर २ विकेट प्रभात जयसूर्या या फिरकीपटूने घेतले.
दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर मारक्रम आणि जोर्झी चांगली सुरूवात करून देण्यात अपयशी ठरले. यानंतर कर्णधार टेम्बा बावुमाने सर्वात मोठी ७० धावांची खेळी केली. तर इतर सर्व फलंदाज फार काही चांगली कामगिरी करू शकले. पण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला सर्वबाद करत सामन्यात पुनरागमन केले.