Sri Lanka announce 16 member squad for ODI series against Team India : श्रीलंकेने भारताविरुद्ध ऑगस्टमध्ये होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी आपल्या १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-२० नंतर त्यांनी आता एकदिवसीय संघाचाहीकर्णधार बदलला आहे. एकदिवसीय मालिकेचेही नेतृत्व चरित असालंका करणार आहे. कुशल मेंडिसच्या जागी त्याला नवीन कर्णधार बनवण्यात आले आहे. भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी असलंकाला टी-२० संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते.
टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर वानिंदू हसरंगाने टी-२० कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या जागी असलंकाला नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली. निवड समितीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मेंडिसला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवले होते. गतवर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातही त्याने अनेक सामन्यांचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने ८ पैकी ६ सामने जिंकले आहेत. असे असतानाही त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले.
हे खेळाडू संघात परतले –
कसोटीतील फलंदाज निशान मदुष्काचा वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. अकिला धनंजय आणि चमिका करुणारत्ने संघात परतले आहेत. टी-२० मालिकेसाठी संघात सामील झालेले दिलशान मदुशंका आणि असिथा फर्नांडो हे वनडे संघाचाही भाग असतील. डावखुरा फिरकी अष्टपैलू दुनिथ वेलांगेलाही स्थान देण्यात आले आहे. आजारी दुष्मंथा चमीरा आणि जखमी नुवान तुषारा यांची वनडे मालिकेसाठी निवड झालेली नाही.
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ:
चरित असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविशका फरांडो, कुशल मेंडिस, सादेरा समरविक्रमा, कामिन्दु मेंडिस, जनित लिंडोंगे, निशान मधुष्का, वानिंदु हसरंगा, दुनिथ मधुष्का, दुनिथ वेलांगे, चमिका करुणारत्ने, महेश तिक्शाना, अकिला धनंजया, दिलशान मधुशंका, मथिशा पतिराना, असिथा फर्नांडो.
भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक :
पहिला एकदिवसीय सामना, २ ऑगस्ट, दुपारी २.३० वाजता, कोलंबो
दुसरा एकदिवसीय सामना, ४ ऑगस्ट, दुपारी २.३० वाजता, कोलंबो
तिसरा एकदिवसीय सामना, ७ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता, कोलंबो