भारत दौऱ्यावर होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे. काही खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे, तर नव्या नावांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर टी-२० नंतर कसोटी मालिका खेळणार आहे. निरोशन डिकवेला आणि कुसल मेंडिस संघात परतले आहेत. वांडरसेचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे.
मेंडिस आणि डिकवेला या दोघांनीही श्रीलंकेची वेस्ट इंडीजविरुद्धची शेवटची मालिका घरच्या मैदानावर खेळली नाही, त्या दोघांवरही इंग्लंडमध्ये बायो-बबल ब्रीचमुळे बंदी घालण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मेंडिसला अलीकडेच आपला फिटनेस सिद्ध करावा लागेल. वेस्ट इंडीजविरुद्धच्या घरच्या मालिकेतही थिरिमाने संघाचा भाग नव्हता. फलंदाजीतील ताकदीसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा – रणजी ट्रॉफी : जुळ्या भावांनी रचला इतिहास, एकाच सामन्यात आणि एकाच संघासाठी केली ‘अशी’ कामगिरी!
वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व सुरंगा लकमलकडे असेल. या मालिकेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणार नाही. लकमलने यापूर्वीच निवृत्ती जाहीर केली आहे. ओशादा फर्नांडो, रोशन सिल्वा, सुमिंदा लक्ष, रमेश मेंडिस (फिटनेसच्या कारणास्तव), मिनोद भानुका, लक्ष संदाकन, असिथा फर्नांडो आणि चमिका गुणसेकरा हे खेळाडू संघात नाहीत. उभय संघांत ४ ते ८ मार्च दरम्यान पहिला तर १२ ते १६ मार्चदरम्यान दुसरा कसोटी सामना रंगणार आहे.
श्रीलंकेचा संघ – दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), पाथुम निसांका, लाहिरू थिरिमाने, धनंजय डी सिल्वा (उपकर्णधार), कुसल मेंडिस (फिटनेसवर आधारित), अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, चरित अस्लंका, निरोशन डिकवेला, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमारा, सुरंगा लकमल, दुष्मंथा चमिरा, विश्व फर्नांडो, जेफ्री वांडरसे, प्रवीण जयविक्रमा, लसिथ एम्बुल्डेनिया.