Sri Lanka Asia Cup Squad: श्रीलंका वगळता इतर सर्व संघांनी आशिया कप २०२३साठी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. आशिया चषक सुरू होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे पण श्रीलंकेने अद्याप त्यांचा संघ जाहीर केलेला नव्हता. मात्र, स्पर्धेला केवळ एक दिवस बाकी असताना त्यांनी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे आणि त्याचे नेतृत्व हे दासुन शनाकाच्या हाती असणार आहे. श्रीलंकेला आशिया चषक स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेशविरुद्ध ३१ ऑगस्ट रोजी पल्लेकेले येथे खेळायचा आहे. उर्वरित सर्व ५ संघांनी आशिया चषकासाठी त्यांचे संघ जाहीर केले आहेत, अफगाणिस्तान हा २७ ऑगस्ट रोजी त्यांचा आशिया चषक संघ घोषित करणारा सर्वात अलीकडील संघ आहे.
श्रीलंकेने आशिया कप २०२३ साठी संघ घोषित केला
आशिया चषकासाठी श्रीलंकेने अद्याप संघ का जाहीर केला नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र त्यांनी आता संघ घोषित केला आहे. वास्तविक, श्रीलंकेचा संघ खेळाडूंच्या दुखापती आणि कोविडची समस्या यामुळे त्यांना संघाची बांधणी करण्यासाठी वेळ होत होता. त्यामुळेच ते अद्याप आपला सर्वोत्तम संघ निवडू शकलेले नव्हते. आशिया चषक स्पर्धा आता तोंडावर आली असताना ते उद्या किंवा परवा संघ जाहीर करतील आशा होती आणि तसेच झाले.
झिम्बाब्वे येथे झालेल्या ICC विश्वचषक पात्रता सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत श्रीलंकेने त्यांचे सर्व ६ सामने जिंकून भारतात होणाऱ्या विश्वचषकात स्थान मिळवले. पण अनेक मोठे खेळाडू उदाहरणार्थ वानिंदू हसरंगा, लाहिरू कुमारा, दिलशान मधुशंका आणि दुष्मंता चमीरा यांना झालेल्या दुखापतींनी त्यांच्या आशिया चषक स्पर्धेच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. जिथे श्रीलंकेला त्यांच्या गटात बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्याशी खडतर सामना करायचा आहे.
श्रीलंकेचा दुसरा गट सामना अफगाणिस्तान विरुद्ध लाहोर येथे होणार आहे. जर संघाची आज किंवा उद्या निवड झाली नाही तर त्यांना सुपर-४ साठी पात्र होणे कठीण जाईल असे दिसत आहे. प्रत्येक संघाला सुपर-४ मध्ये पोहोचण्यासाठी किमान एक सामना जिंकणे आवश्यक आहे. श्रीलंकेचे चार स्टार खेळाडू दुखापतींमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. दुस्मंथा चमीरा आणि वानिंदू हसरंगा यांच्यानंतर वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंकालाही दुखापत झाली आहे, तर दुसरा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारालाही आशिया कपला मुकावे लागण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, २५ ऑगस्ट रोजी श्रीलंकेचे दोन खेळाडू अविष्का फर्नांडो आणि यष्टिरक्षक कुसला परेरा कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आशिया चषक स्पर्धेसाठी संघ निवड ही श्रीलंकेसाठीही कसोटी होती कारण हाच संघ विश्वचषकात किरकोळ बदल करून खेळण्याची शक्यता आहे. यामुळेच श्रीलंकेने आशिया चषक २०२३साठी अद्याप आपला संघ घोषित केलेला नव्हता. श्रीलंकेने आपला संघ जाहीर केला आहे. दासुन शनाकाच्या नेतृत्वाखाली संघ खेळणार आहे. कुसल मेंडिस त्याचा उपकर्णधार असेल. मात्र, घोषणेपेक्षा मोठी बातमी म्हणजे वानिंदू हसरगा दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.
आशिया कपसाठी श्रीलंकेचा संघ
दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल परेरा, कुसल मेंडिस (उपकर्णधार), चरित असलंका, धनंजय डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, महेश तिक्षणा, ड्युनिथ वेल्स, मतिशा पाथिराना, कसून रजिथा, दुशान हेमंथा, बिनुरा फर्नांडो, प्रमोद मदुशन.