SL vs AUS 1st ODI Highlights in Marathi: ऑस्ट्रेलियन संघ चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी श्रीलंकेविरूद्ध वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला पराभवाचा मोठा धक्का दिला. कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर केवळ २१५ धावांचे लक्ष्य होते, मात्र तरीही संघाने ४९ धावांनी सामना गमावला. ऑस्ट्रेलिया केवळ ३३.५ षटकांत फक्त १६५ धावा करत सर्वबाद झाला. कर्णधार चरिथ असलंका आणि महिश तीक्ष्णा हे श्रीलंकेच्या विजयाचे हिरो ठरले. असलंकाने १२७ धावांची खेळी खेळली तर तीक्ष्णाने ४ विकेट घेतल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोलंबोच्या अवघड खेळपट्टीवर श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली. या संघाने आपला निम्मा संघ अवघ्या ५५ धावांत गमावला होता. मात्र यानंतर कर्णधार असलंकाने दुनित वेलालगेसह अर्धशतकी भागीदारी करत संघाला १२२ धावांपर्यंत नेले. मॅथ्यू शॉर्टच्या चेंडूवर वेलालगे बाद झाला आणि त्यानंतर श्रीलंकेने १३५ धावांत ८ विकेट गमावल्या पण असलंकाने क्रीजवर राहून अप्रतिम शतक झळकावून आपल्या संघाला २०० च्या पुढे नेले. त्याने एसान मलिंगासह अर्धशतकी भागीदारी केली. १०व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मलिंगाने २६ चेंडूत १ नाबाद धाव काढली, पण विकेट गमावली नाही.

श्रीलंकेच्या संघाने मोठ्या कष्टाने २१४ धावांचा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियन संघ हा विजय सहज मिळवेल असे वाटत होते पण तसे झाले नाही. ऑस्ट्रेलियालाही कोलंबोच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं कठीण झालं होतं. या संघाने १०व्या षटकापर्यंत ४ विकेट गमावल्या होत्या, त्यापैकी एक स्टीव्ह स्मिथ होता. स्मिथ १२ धावा करून बाद झाला. शॉर्टला खाते उघडता आले नाही. जॅक फ्रेझर मॅकगर्कने केवळ २ धावा केल्या. कूपर कॉनोलीला केवळ ३ धावा करता आल्या.

लबुशेनही केवळ १५ धावा करून बाद झाला. तीक्ष्णाने त्याची विकेट घेतली. शॉन ॲबॉट आणि स्पेन्सर जॉन्सनलाही बाद करून तीक्ष्णाने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मोठी गोष्ट म्हणजे तीक्ष्णाने आपल्या स्पेलमध्ये ७ वाइड चेंडू टाकले, पण तरीही त्याने चार विकेट घेत संघाच्या विजयाचा हिरो ठरला. दोन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेने ४९ धावांनी विजय मिळवला आहे. तर दुसरा वनडे सामना १४ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे.