Sri Lanka beat Netherlands by 128 runs to win: श्रीलंका आणि नेदरलँड्स क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेल. झिम्बाब्वेतील हरारे येथे रविवारी (९ जुलै) झालेल्या सामन्यात श्रीलंकेने नेदरलँड्सचा १२८ धावांनी पराभव केला. या सामन्याचा विश्वचषकातील स्थानांवर कोणताही परिणाम झालेला नाही. श्रीलंका आणि नेदरलँड्सने सुपर सिक्समध्ये अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवून आगामी विश्वचषकात आधीच आपले स्थान निश्चित केले होते.

या स्पर्धेत १० संघांनी सहभाग घेतला. अमेरिका, नेपाळ, आयर्लंड आणि संयुक्त अरब अमिरातीचे संघ गट फेरीतून बाहेर पडले. यानंतर सुपरसिक्समध्ये चार संघांना बाहेरचा रस्ता पकडावा लागला. दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज व्यतिरिक्त झिम्बाब्वे, स्कॉटलंड आणि ओमानचे संघ विश्वचषकासाठी पात्र ठरू शकले नाहीत. १९७५ आणि १९७९ मध्ये स्पर्धा जिंकणारा वेस्ट इंडिज संघ प्रथमच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.

Ranji Trophy 2025 Mumbai defeated Meghalaya by an innings and 456 runs
Ranji Trophy 2025 : मुंबईचा मेघालयवर दणदणीत विजय; ८ विकेट्स आणि ८४ धावांसह शार्दूल ठाकूरचे महत्त्वपूर्ण योगदान
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
SL vs AUS Josh Inglis scores century on debut test match in front of parents breaks many records at Galle
SL vs AUS : जोश इग्लिसचे कसोटी पदार्पणात विक्रमी शतक! मोडले अनेक विक्रम
Usman Khawaja becomes first Australian to score a Test double century in Sri Lanka at Galle
Usman Khawaja Double Century : उस्मान ख्वाजाचे ऐतिहासिक द्विशतक! श्रीलंकेत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला ऑस्ट्रेलियन
INDW beat SCOTW by 150 Runs in U19 Womens T2O World Cup super 6 Matches
INDU19 vs SCOWU19: भारताचा महिला संघ U19 टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये, स्कॉटलंडचा १५० धावांनी मोठा पराभव; त्रिशाचे विक्रमी शतक
INDW beat SLW BY 60 Runs with third Consecutive Win in U19 T20 World Cup 2025
INDW vs SLW: भारताच्या लेकींनी वर्ल्डकपमध्ये नोंदवला सलग तिसरा विजय, श्रीलंकेचा मोठा पराभव; उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक
IND vs ENG Suryakumar Yadav shed light on the situation, revealing that the exclusion of Mohammed Shami was purely a tactical decision
IND vs ENG : मोहम्मद शमी फिट की अनफिट? पहिल्या सामन्यातून वगळण्याबाबत सूर्यकुमार यादवने केला खुलासा

नेदरलँड्सने श्रीलंकेला २३३ धावांत गुंडाळले –

या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर त्यांच्या संघाने श्रीलंकेला ४७.५ षटकांत २३३ धावांत गुंडाळले. लंकन संघाकडून सहान आर्चिगेने ५७ धावा केल्या. चरित अस्लंकाने ३६, कुशल मेंडिन्सने ४३, वानिंदू हसरंगाने २९ आणि पाथुम निसांकाने २३ धावांचे योगदान दिले. सदीरा समरविक्रमाने १९ आणि महिष तीक्षानाने १३ धावा केल्या.

हेही वाचा – VIDEO: “…तर माझ्या नाकातून रक्त येईल”; विजयानंतर मार्क वूड असा का म्हणाला? जाणून घ्या कारण

दासुन शनाका फलंदाजीत अपयशी ठरला –

धनंजय डिसिल्वा आणि मथिशा पाथिराना यांना प्रत्येकी केवळ चार धावा करता आल्या. त्याचवेळी कर्णधार दासुन शनाकाची बॅटही चालली नाही. त्याला केवळ एक धाव करता आली. नेदरलँडकडून व्हॅन बीक, रायन क्लेन, विक्रमजीत सिंग आणि साकिब झुल्फिकार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. आर्यन दत्तने एक विकेट घेतली.

श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी केली शानदार गोलंदाजी –

२३४ धावांचे लक्ष्य पाहता नेदरलँडचा संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, मात्र लंकन गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. श्रीलंकेच्या फिरकीपटूंपुढे नेदरलँडच्या फलंदाजाकडे उत्तर नव्हते. संपूर्ण संघ १९५ धावांवर गारद झाला. नेदरलँडकडून मॅक्स ओडाडने ३३, लोगन व्हॅन बीकने २० आणि विक्रमजीत सिंगने १३ धावा केल्या. या तिघांशिवाय दहाच्या आकड्याला कोणीही स्पर्श करू शकले नाही. महिष तीक्षानाने चार, दिलशान मदुशंकाने तीन आणि वनिंदू हसरंगाने दोन विकेट्स घेतल्या.

Story img Loader