रविवार भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी सुपर संडे ठरवत टीम इंडियानं यंदाच्या वर्ल्डकपमधला आपला सलग आठवा विजय साजरा केला. या विजयात सिंहाचा वाटा उचलला तो किंग कोहली विराटनं. विराट कोहलीनं कारकिर्दीतलं ४९वं शतक झळकावत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यामुळे भारतासह जगभरातल्या क्रीडारसिकांकडून विराट कोहलीवर स्तुतिसुमनं उधळली जात आहेत. एकीकडे सगळेच विराट कोहलीचं कौतुक करत असताना दुसरीकडे श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसला विराट कोहलीचं अभिनंदन का करावं? असा प्रश्न पडलाय!

काय म्हणाला कुसल मेंडिस?

यंदाच्या विश्वचषकातलं श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र, तरीही त्यांचे लीग फेरीतील सामने शिल्लक आहेत. त्यातील बांगलादेशविरुद्धचा सामना सोमवारी असून त्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसनं केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे. “विराट कोहलीनं कारकिर्दीतलं ४९वं शतक झळकावून सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. तू त्याचं अभिनंदन करशील का?” असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता त्यावर “मी विराट कोहलीचं अभिनंदन का करेन?” असा उलट प्रश्न कुसल मेंडिसनं केला.

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”
ramdas athawale poem for pm modi
VIDEO : “पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणूनच ते…”; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी!

“मला आशा आहे की…”, विराट कोहलीच्या ४९व्या वनडे शतकावर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया…

नेटिझन्स मेंडिसवर भडकले!

दरम्यान, कुसल मेंडिसच्या या विधानावर नेटिझन्स, विशेषत: भारतीय क्रिकेटचाहते चांगलेच भडकले आहेत.

काहींनी श्रीलंका यंदाच्या विश्वचषकात तळाशी असण्याला हीच बाब कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.

एका युजरने एशिया कपमध्ये भारतानं श्रीलंकेच्या केलेल्या पराभवाची जाणीव करून दिली.

काहींच्या मते विराटचं शतक म्हणजे आयसीसीच्या इतिहासातला एक महान क्षण होता!

याशिवाय काही युजर्सनं विराटच्या शतकाबरोबरच बाबर आझमच्या शतकावरही अभिनंदन व्हायला हवं, असं म्हटलं आहे. तर काहींनी कुसल मेंडिस “मी का विराट कोहलीचं अभिनंदन करू?” (Why would I congratulate him?) असा प्रश्न विचारला नसून “मी त्याचं अभिनंदन का करणार नाही?” (Why Wont I congratulate him?) असा प्रश्न केल्याचाही दावा केला आहे.

मास्टर ब्लास्टरनं व्यक्त केला ‘हा’ विश्वास!

दरम्यान, विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केल्यानंतर सचिननं त्यावर प्रतिक्रिया दिली. “मला ४९व्या शतकापासून ५०व्या शतकापर्यंतचा प्रवास करण्यासाठी ३६५ दिवस लागले. मला आशा आहे की विराट कोहलीला तेवढे दिवस लागणार नाही. तो पुढच्या काही दिवसांमध्येच हा टप्पा पार करेल”, अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकरनं दिली आहे.