विजयासाठी मिळालेल्या २७१ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची चौथ्या दिवसअखेर ७ बाद १२७ अशी घसरगुंडी उडाली आहे. श्रीलंकेला कसोटी विजयासाठी ३ विकेट्सची आवश्यकता आहे तर पाकिस्तानला अजूनही १४४ धावांची गरज आहे. २ बाद १७७ वरुन पुढे खेळणाऱ्या श्रीलंकेचा डाव २८२ धावांवर आटोपला. कुमार संगकाराने ५९ तर महेला जयवर्धनेने ५४ धावांची खेळी साकारली. पाकिस्तानतर्फे वहाब रियाझ आणि सईद अजमल यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची घसरगुंडी उडाली. रंगना हेराथने सर्वाधिक ४ बळी घेतले. खेळ संपला तेव्हा सर्फराझ अहमद ३८ तर वहाब रियाझ २ धावांवर खेळत आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंका १-० आघाडीवर आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा