Sanath Jayasuriya as cricket consultant of SLC : श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. क्रिकेट सुधारण्यासाठी बोर्डाने माजी दिग्गज कर्णधार सनथ जयसूर्याला पूर्णवेळ क्रिकेट सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. माजी फलंदाजाने बोर्डाशी एक वर्षाचा करार केला आहे. जयसूर्या आपल्या कार्यकाळात श्रीलंकन ​​संघाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांवर बारीक नजर ठेवणार आहे. याशिवाय खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी कोचिंग स्टाफवरही लक्ष ठेवणार आहे.

सध्या श्रीलंका क्रिकेट बदलाच्या टप्प्यातून जात आहे. बुधवारी (१३ डिसेंबर) बोर्डाने नवीन निवड समिती स्थापन केली आहे. ज्याचा अध्यक्ष माजी क्रिकेटपटू उपुल थरंगाला करण्यात आला आहे. नवीन पाच सदस्यीय निवड समितीमध्ये माजी फिरकीपटू अजंथा मेंडिस, इंडिका डी सरम, थरंगा परनाविताना आणि दिलरुवान परेरा यांचाही समावेश आहे.

Ladki Bahin Yojana Aditi Tatkare (1)
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले? लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी होणार? आदिती तटकरेंनी थेट पत्रकच काढलं
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास
Who is Sanjay Malhotra?
Sanjay Malhotra : आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्त झालेले संजय मल्होत्रा कोण आहेत?
Devendra Fadnavis sworn in as twenty first Chief Minister of Maharashtra on 5 December 2024
विधानसभेची नवी दिशा
Sensex, Reserve Bank, policy ease Reserve Bank,
रिझर्व्ह बँकेकडून धोरण नरमाईची आशा, ‘सेन्सेक्स’मध्ये ८०० अंशांची तेजी

श्रीलंका बोर्डाला आयसीसीच्या बंदीला सामोरे जावे लागत आहे –

श्रीलंका क्रिकेट बोर्डावर (एसएलसी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बंदी घातली आहे. श्रीलंका सरकारच्या हस्तक्षेपामुळे आयसीसीने हा निर्णय घेतला. श्रीलंकेवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आलेली नाही पण आयसीसीने त्यांच्याकडून अंडर-१९ पुरुष विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद काढून घेतले आहे. आता १९ जानेवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत विश्वचषक खेळवला जाणार आहे.

हेही वाचा – IND vs SA : सूर्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी करत मोडला विराटचा विक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू

सनथ जयसूर्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द –

सनथ जयसूर्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने श्रीलंकेसाठी एकूण ५८६ सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याने ६५१ डावात २१०३२ धावा केल्या आहेत. जयसूर्याने कसोटीच्या १८८ डावांमध्ये ४०.०७ च्या सरासरीने ६९७३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्याच्या ४३३ डावांमध्ये ३२.१३ च्या सरासरीने १३४३० धावा आणि टी-२०च्या ३० डावांमध्ये २३.३ च्या सरासरीने ६२९ धावा केल्या आहेत.त्याबरोबर गोलंदाजीत त्याने ५३२ डावात ४४० विकेट्स मिळवल्या आहेत. जयसूर्याने १४० कसोटी डावात ३४.३५ च्या सरासरीने ९८ विकेट्स, ३६८ एकदिवसीय डावात ३६.७५ च्या सरासरीने ३२३ विकेट्स आणि २४ टी-२० डावात २४.० च्या सरासरीने १९ विकेट्स घेतल्या आहेत.

Story img Loader