श्रीलंकेचा क्रिकेटपटू दानुष्का गुणथिलका याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या ३ वर्षांपासून तो कसोटी संघाबाहेर होता. गेल्या वर्षी जूनमध्ये त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही बंदी घालण्यात आली होती. त्याने शेवटचा कसोटी सामना २०१८ मध्ये खेळला होता. दोन दिवसांपूर्वी श्रीलंकेचा क्रिकेटर भानुका राजपक्षे याने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

गुणथिलकाशिवाय श्रीलंकेचे दोन खेळाडू कुसल मेंडिस आणि निरोशन डिकवेला यांच्यावरही बंदी घालण्यात आली होती. गेल्या वर्षी जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यात या तिन्ही खेळाडूंनी बायो बबलचे उल्लंघन केले होते. तेव्हापासून ते संघाबाहेर होते. गुणथिलकाच्या निवृत्तीचे वृत्त आल्यानंतर श्रीलंका बोर्डाने या तिन्ही क्रिकेटपटूंवरील बंदी उठवली. याचा अर्थ मेंडिस, डिकवेला आणि गुणतिलाका हे तिघेही झिम्बाब्वे दौऱ्यासाठी उपलब्ध असतील.

३० वर्षीय गुणथिलकाने अचानक घेतलेल्या या निर्णयामागचे कारणही सांगितले. तो म्हणाला, ”सध्याच्या काळात श्रीलंका ​​क्रिकेटच्या फिटनेस पातळीची मागणी बदलली आहे. बोर्डाने फिटनेस चाचणीत नुकताच बदल केला असून आता २ किमी धावणे ८ मिनिटे १० सेकंदात पूर्ण करावे लागणार आहे. इतरही अनेक बदल करण्यात आले आहेत.”

हेही वाचा – नाद करा, पण आमचा कुठं..! विराटचा अपमान करणाऱ्या ऑस्ट्रेलियन मीडियाला जाफरचं सणसणीत उत्तर!

विशेष म्हणजे गुणथिलकाने ६ वर्षांपूर्वी म्हणजेच ७ जानेवारी २०१६ रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या कारकिर्दीत केवळ ८ कसोटी सामने खेळले आणि २ अर्धशतकांच्या मदतीने एकूण २९९ धावा केल्या. त्याने २०१७ मध्ये भारताविरुद्ध गॉल येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

Story img Loader