Sri Lanka vs Bangladesh Match Updates: आशिया चषक २०२३ मधील दुसरा सुपर फोर फेरीतील सामना श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात खेळला जात आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २५७ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर बांगलादेश संघापुढे २५८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ असा आहे. श्रीलंकेकडून सदिरा समरविक्रमाने सर्वाधिक ९३ धावा केल्या. त्याचबरोबर बांगलादेशकडून हसन महमूदने तीन विकेट्स घेतल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सदिरा समरविक्रमा आणि कुसल मेंडिस चमकले –

बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ गडी गमावून २५७ धावा केल्या. श्रीलंकेसाठी कुसल मेंडिस आणि सदिरा समरविक्रमाने पन्नास धावांचा टप्पा ओलांडला. कुसल मेंडिसने ७३ चेंडूत ५० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याचबरोबर सदिरा समरविक्रमाने ७२ चेंडूत ९३ धावा केल्या. या खेळाडूने आपल्या खेळीत ८ चौकार आणि २ षटकार मारले.

श्रीलंकेचे सलामीवीर पथुम निशांक आणि दिमुथ करुणारत्ने यांनी पहिल्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी केली. पथुम निशांकने ६० चेंडूत ४० धावा केल्या. तसेच दिमुथ करुणारत्नेने १७ चेंडूत १८ धावा केल्या. यानंतर कुसल मेंडिसने महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, यानंतर फलंदाजीला आलेले चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा आणि कर्णधार दाशून शनाका झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. पण सदिरा समरविक्रमाने संघाची एक बाजू लावून धरली.

हेही वाचा – IND vs PAK : “ही तर फक्त सुरुवात आहे, अजून…”; सुपर-4 सामन्यापूर्वी टीम इंडियाला शाहीन आफ्रिदीने दिला इशारा

हसन महमूद आणि तस्किन अहमदची शानदार गोलंदाजी –

बांगलादेशच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले, तर हसन महमूद आणि तस्किन अहमद यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. शरीफुल इस्लामने २ खेळाडूंना बाद केले. मात्र, बांगलादेशसमोर सामना जिंकण्यासाठी २५८ धावांचे लक्ष्य आहे. शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेशी संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. वास्तविक, बांगलादेश हा सामना हरला तर ते आशिया कपमधून बाहेर पडेल. अशा प्रकारे, बांगलादेशसाठी हा करो या मरो असा सामना आहे. यापूर्वी सुपर-4 फेरीत पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lanka have given bangladesh a target of 258 runs to win in asia cup 2023 vbm