ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी लसिथ मलिंगाच्या जागी अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. मात्र दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज मलिंगाने श्रीलंकेच्या संघात स्थान मिळवण्यात यश मिळवले आहे.
दुखापतीमुळे सामन्यात न खेळता कर्णधारपद भूषवणाऱ्या मलिंगाला संघ व्यवस्थापनाने पदाचा राजीनामा देण्यास सांगितले. २०१४ मध्ये बांगलादेश येथे झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत मलिंगाच्याच नेतृत्वाखालील श्रीलंकेने जगज्जेतेपदाला गवसणी घातली होती.
श्रीलंकेचा संघ
अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), दिनेश चंडिमल (उपकर्णधार), तिलकरत्ने दिलशान, लाहिरू थिरिमाने, शेहान जयसूर्या, मिलिंदा सिरिवर्दने, चमरा कपुगेद्रा, डसून शनका, थिसारा परेरा, नुवान कुलसेकरा, दुश्मंता चामीरा, रंगना हेराथ, सुरंगा लकमल, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा.
डी’सिल्व्हा नवे अध्यक्ष
श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने निवड समिती बडतर्फ केली आहे. श्रीलंकेचे माजी कर्णधार अरविंद डी’सिल्व्हा यांच्या नेतृत्वाखालील नव्या निवड समितीमध्ये कुमार संगकारा, रोमेश कालुवितरणा, ललित कुलुपेरुमा आणि रणजित मदुरासिंघे यांचा समावेश आहे.