श्रीलंकेच्या महिला क्रिकेट मंडळातील तीन अधिकाऱयांना गुरूवारी निलंबित करण्यात आले. देशाच्या राष्ट्रीय संघात निवड करण्यासाठी महिला खेळाडूंकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे.
संघाच्या निवड समितीतील सदस्यांशी शारीरिक संबंध ठेवा अन्यथा क्रिकेट संघात स्थान मिळणार नाही, अशी मागणी क्रिकेट मंडळातील तीन अधिकाऱयांनी केल्याचा आरोप एका महिला क्रिकेटपटूने सहा महिन्यांपूर्वी केला होता.  प्रकरणाच्या चौकशीसाठी नोव्हेंबर २०१४ साली श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांनी समिती नेमली होती. क्रिकेट मंडळातील तीन अधिकारी दोषी असल्याचे चौकशी समितीच्या अहवालात निष्पन्न झाल्याने तीनही अधिकाऱयांना घरचा रस्ता दाखविण्यात आल्याचे श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने म्हटले आहे. या तीन अधिकाऱयांपैकी दोघांना लैंगिक छळ केल्याचा तर एकाला गैरवर्तणुकीबाबत दोषी ठरविण्यात आले आहे. दरम्यान, या तिघांपैकी कोणाविरोधातही शारीरिक संबंधाबाबत पुरावे नसल्याचेही क्रिकेट मंडळाने म्हटले आहे. तसेच या तिघांची नावेही जाहीर करण्यात आलेली नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा