श्रीलंकेने चित्तथरारक झालेल्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाकिस्तानचा २४ धावांनी पराभव करून दोन सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. या विजयामुळे श्रीलंकेने नुकत्याच जाहीर झालेल्या ट्वेन्टी-२० क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
कुशल परेराने ५९ चेंडूत साकारलेल्या ८४ धावांच्या खेळीमुळे श्रीलंकेने २० षटकांत ३ बाद २११ धावा रचल्या होत्या. तिलकरत्ने दिलशानने ४८ धावा फटकावत त्याला चांगली साथ दिली होती. हे आव्हान पेलताना पाकिस्तानचा डाव १९.२ षटकांत १८७ धावांवर आटोपला. पाकिस्तानकडून शार्जील खानने ५० तर सोहेल तन्वीरने ४१ धावा फटकावल्या. सचित्र सेनानायकेने तीन बळी मिळवत आपली छाप पाडली. ‘‘श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्धचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवल्यामुळे श्रीलंका १२९ गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे,’’ असे आयसीसीच्या पत्रकात म्हटले आहे. पाकिस्तानने १२१ गुणांसह चौथे स्थान पटकावले आहे. श्रीलंकेला अव्वल स्थान अबाधित राखण्यासाठी दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजयाची आवश्यकता होती.
श्रीलंकेची पाकिस्तानवर मात
श्रीलंकेने चित्तथरारक झालेल्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाकिस्तानचा २४ धावांनी पराभव करून दोन सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.
First published on: 15-12-2013 at 06:28 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lanka takes over pakistan in t